Khed : च-होली खुर्दमध्ये बैलगाडा शर्यती दरम्यान दगडफेक

एमपीसी न्यूज – खेड तालुक्यातील च-होली खुर्दमध्ये बैलगाडा शर्यती दरम्यान वेळेवरुन दगडफेक झाल्याची माहिती पुढे आली आहे. यामुळे काहीकाळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.(Khed) आळंदी पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. पण, याप्रकरणी कोणीही तक्रार दिली नाही. त्यामुळे कोणताही गुन्हा दाखल करण्यात आला नाही.

 

 

PCMC :  महापालिका तिजोरीत 1 हजार 863 कोटींचा महसूल जमा

 

 

खेड तालुक्यातील च-होली खुर्दमध्ये महाराष्ट्र केसरी बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. शर्यतील बैलगाडा प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (Khed) बैलगाडा मालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. थार गाडी, ट्रॅक्टर, दुचाकी अशी विविध बक्षीसे होती. शर्यतीच्या अंतिम फेरीत वेळेवरुन दगडफेक झाली.  मंचाच्या दिशेने दगडफेक करण्यात आली. यामुळे काहीकाळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

 

 

आळंदी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सुनील गोडसे म्हणाले, सेकंदाच्या वेळेवरुन वाद झाला होता. आपसात मिटला. बाचाबाची झाली होती. दगडफेक झाली नाही. (Khed) कोणी तक्रार दिली नाही. त्यामुळे कोणताही गुन्हा दाखल केला नाही. तक्रार आली तर दाखल करून घेतली जाईल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.