Pimpri : कष्टकरी महिलांवरील अन्याय थांबवा; कष्टकरी संघर्ष महासंघाची महिला आयोगाच्या अध्यक्षांकडे मागणी

एमपीसी न्यूज – महाराष्ट्र राज्यातील कष्टकरी महिला कामगारांचे जिवन असुरक्षित असून घरेलु कामगार, बांधाकाम कामागर, कंत्राटी सफाई महिला कामगार यांना पर्यवेक्षक, मालक , प्रशासकीय यंत्रणेतून छळ, मारहाण, देय वेतन नाकारणे असे अन्याय थांबवावेत अशी मागणी कष्टकरी संघर्ष महासंघ, पिंपरी (Pimpri) तर्फे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्याकडे करण्यात आली.

Chinchwad : नालेसफाई, जलपर्णी काढण्याच्या कामाला गती द्या; श्रीरंग बारणे यांच्या अधिका-यांना सूचना

यावेळी कामगार नेते काशिनाथ नखाते, राष्ट्रवादी काँग्रेस महिला वरिष्ठ कार्याध्यक्षा कविता खराडे, महासंघाच्या महिलाध्यक्षा माधुरी जलमूलवार, अनिता जाधव, बालाजी लोखंडे, उमेश डोर्ले, पांडुरंग शेळवणे आदी उपस्थित होते.

महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, चिखली येथे फळ विक्री करणाऱ्या मनीषा शेळवणे यांच्यावर महापालिका प्रशासन व पोलीस प्रशासन यांनी चुकीच्या पद्धतीने कारासाई करून त्यांना बेदम मारहाण करण्यात आली, याची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी.

चिखलीतील घटनेप्रमाणे विविध ठिकाणी कष्टकरी महिला कामगार काम करत असताना किमान व समान वेतन न देणे, कामगार अपघात प्रसंगी भरपाई न देणे, छेडछाड असे अनेक प्रकार घडत असून कष्टकरी महिलांवरील अन्याय दूर करण्यासाठी आपण प्रयत्न करावेत. यावर सकारात्मक विचार करू असे आश्वासन राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांनी यावेळी दिले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.