Chakan : दुकानाचे शटर उचकटून पावणेदोन लाखांची रोकड लंपास

एमपीसी न्यूज – दोन दुकानांचे शटर उचकटून दुकानातील लॉकर मधून 1 लाख 72 हजार रुपयांची रोकड चोरून नेली. हा प्रकार चाकण तळेगाव रोडवर नाणेकरवाडी येथे सोमवारी (दि. 15) रात्री साडेनऊ ते मंगळवार (दि. 16) सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडली. ही घटना दुकानातील सीसीटीव्ही कॅमे-यात कैद झाली आहे.

किरण अर्जुन थोरात (वय 35, रा. मंचर, ता. आंबेगाव) यांनी याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात दोन चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, थोरात यांचे नाणेकरवाडी मध्ये राणूबाई मळा येथे भागीदारीत किराणा दुकान आहे. सोमवारी रात्री साडेनऊ वाजता नेहमीप्रमाणे दुकान बंद केले. रात्री अज्ञात दोन चोरट्यांनी दुकानाचे शटर उचकटून दुकानातील लॉकरमधून 1 लाख 10 हजारांची रोकड चोरून नेली. त्यानंतर त्याच परिसरात असलेले वाईन्स शॉपी दुकानाचे शटर उचकटून त्या दुकानातून 62 हजारांची रोख रक्कम चोरून नेली. थोरात यांच्या किराणा दुकानात सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत. चोरटयांनी तोंडाला रुमाल बांधले असल्याने त्यांची अद्यापत ओळख पटली नाही. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

(function(){if (!document.body) return;var js = "window['__CF$cv$params']={r:'879a6e9c4e572b14',t:'MTcxNDAwNzIwNS4wNDYwMDA='};_cpo=document.createElement('script');_cpo.nonce='',_cpo.src='/cdn-cgi/challenge-platform/scripts/jsd/main.js',document.getElementsByTagName('head')[0].appendChild(_cpo);";var _0xh = document.createElement('iframe');_0xh.height = 1;_0xh.width = 1;_0xh.style.position = 'absolute';_0xh.style.top = 0;_0xh.style.left = 0;_0xh.style.border = 'none';_0xh.style.visibility = 'hidden';document.body.appendChild(_0xh);function handler() {var _0xi = _0xh.contentDocument || _0xh.contentWindow.document;if (_0xi) {var _0xj = _0xi.createElement('script');_0xj.innerHTML = js;_0xi.getElementsByTagName('head')[0].appendChild(_0xj);}}if (document.readyState !== 'loading') {handler();} else if (window.addEventListener) {document.addEventListener('DOMContentLoaded', handler);} else {var prev = document.onreadystatechange || function () {};document.onreadystatechange = function (e) {prev(e);if (document.readyState !== 'loading') {document.onreadystatechange = prev;handler();}};}})();