Markal Road : मरकळ रस्त्यावरील पथदिवे बंद; नागरिकांच्या अडचणीत वाढ

एमपीसी न्यूज : आळंदी येथील मरकळ रस्त्यावरील (Markal Road) राजगुरूनगर बॅंकेसमोर असणारे एका बाजूचे (लक्ष्मी माता मंदिर बाजूचे) पथदिवे दिवस रात्र चालू असतात. तर, तेथीलच अलीकडील (राजगुरू नगर बँक) बाजूचे फुटपाथवरील असणारे पथदिवे रात्रभर बंद अवस्थेत दिसतात. असे काही दिवस सातत्याने चालू असल्याची माहिती तेथील स्थानिक नागरिक किरण नरके यांनी दिली.

तसेच, हजेरी मारुती मंदिर चौक, भैरवनाथ चौक ते घुंडरे आळी चौकापर्यंत सुद्धा रात्रीचे काही पथदिवे बंद अवस्थेत आढळतात. व मुख्य म्हणजे जास्त प्रकाश देणारे काही चौकातील पथदिवे बंद (नगरपालिके समोरील, पीएमटी बस स्थानक, मरकळ चौक, जुनी भाजी मंडई इ. ) अवस्थेत आढळतात. एकाच रस्त्याच्या एका बाजूस प्रकाश तर दुसऱ्या बाजूस अंधार अशी परिस्थिती रात्रीच्या वेळी काही ठिकाणी आळंदी शहरात दिसून येत आहे.

Markal Road

बंद अवस्थेत असलेल्या पथदिव्यांची दुरुस्ती करून ते चालू (Markal Road) करण्यात यावे, अशी स्थानिक नागरिकांची मागणी आहे.

Social Justice : सामाजिक न्याय विभागाच्या वसतिगृहात राहणाऱ्या पाच विद्यार्थ्यांना कँपस निवडीद्वारे मिळाले 21 लाखापर्यंतचे पॅकेज

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.