Pune : जादा भाडे आकारणा-या ‘ट्रॅव्हल्स’वर होणार कडक कारवाई

एमपीसी न्यूज – शासन नियमानुसार राज्य परिवहन तिकीट दरापेक्षा दीड पट जादा भाडे आकारण्याचा अधिकार ट्रॅव्हल्स चालकांना आहे. मात्र, दिवाळीच्या पार्श्वभूमीवर जादा भाडे आकारून प्रवाशांची लूट केली जाते. या पार्श्वभूमीवर प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून शहरातील ट्रॅव्हल संघटनांसोबत झालेल्या बैठकीत जादा भाडे न करण्याच्या सूचना केल्या आहेत. विशेषतः विविध बुकिंग अॅप वर जादाभाडे आकारल्याचे दिसून येते अशी तक्रार आल्यास त्यावर कडक कारवाई करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.

दिवाळीनिमित्त गावी जाणार या प्रवासी संख्येत मोठी वाढ होत आहे. या काळात राज्य परिवहन बसेस हाउसफुल होत असल्याने नाईलाजास्तव प्रवासी खासगी बसने प्रवास करतात. याचा फायदा घेत खासगी चालकांकडून प्रवाशांची लूट केली जाते. या पार्श्वभूमीवर मंगळवारी प्रादेशिक परिवहन कार्यालयातील अधिकार्‍यांनी शहरातील विविध संघटनांसोबत बैठक घेतली यात ट्रॅव्हल चालकांनी सूचना दिल्या असून सूचनांचे पालन न केल्यास कारवाईचा इशारा दिला आहे. प्रादेशिक परिवहन कार्यालयातील वायूवेग पथकाच्या माध्यमातून जादा भाडे आकारणाऱ्यांवर लक्ष ठेवले जाणार असल्याचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद सगरे यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.