Lonavala: 15 ऑगस्टच्या पार्श्वभूमीवर मावळात कडक पोलीस बंदोबस्त; पर्यटनासाठी येणार्‍यांवर होणार गुन्हे दाखल

Strict police security in Mavla on the backdrop of 15 August; Crimes will be registered against those who come for tourism.

एमपीसी न्यूज – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मावळ तालुक्यातील सर्व पर्यटनस्थळांवर जाण्यास यावर्षी पर्यटक‍ांना बंदी घालण्यात आली आहे. येत्या 15 ऑगस्टला शासनाच्या आदेशाचे उल्लंघन करून कोणी मावळात पर्यटनासाठी आले तर त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याच्या सूचना मावळ विभागातील सर्व प्रभारी पोलीस अधिकार्‍यांना देण्यात आल्या आहेत.

कोरोना महामारीचा प्रादुर्भाव मुंबई पुण्यासह मावळ तालुका व लोणावळा शहरात देखील वाढू लागला आहे. शासनाने लाॅकडाऊनचे निर्बंध कमी करण्यासाठी व टप्प्या टप्प्याने उठविण्यास सुरू केले असले तरी जिल्हाबंदी कायम ठेवली आहे.

मुंबई पुण्याहून तसेच इतर जिल्हे व राज्यांमधून लोणावळ्यात व मावळात येणार्‍या वाहनांची तपासणी करण्यासाठी चेकपोस्ट नाके उभारण्यात आले आहेत. विना परवाना कोणी मावळात येण्याचा प्रयत्न केल्यास त्यांच्यावर कडक कायदेशीर व आपत्ती व्यवस्थापन कायद्यांन्वे गुन्हे दाखल करण्यात येईल असे उपविभागीय पोलीस अधिकारी नवनित काँवत यांनी सांगितले.

लोणावळ्यात आतापर्यत 889 जणांवर कारवाई झाली असून न्यायालयाने यापैकी 270 खटल्यांमध्ये 2 लाख 63 हजाराचा दंड वसूल केला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.