Talegaon Dabhade News : तळेगाव दाभाडे नगरपरिषदेत कर्मचाऱ्यांसाठी कठोर निर्बंध

दोन डोस झाले असतील तरच मिळणार प्रवेश

एमपीसी न्यूज – कोरोना आणि ओमायक्रॉनचा संसर्ग वाढत असल्याने शासनाने काही निर्बंध कठोर केले आहेत. त्या पार्श्वभूमीवर तळेगाव दाभाडे नगरपरिषदेने देखील कठोर उपाययोजना सुरू केल्या असून त्या नगरपरिषदेतील कर्मचाऱ्यांसाठी देखील लागू करण्यात आल्या आहेत. कोरोना प्रतिबंध लसीचे दोन्ही डोस झाले असतील तरच कर्मचाऱ्यांना नगरपरिषदेच्या कार्यालयात प्रवेश दिला जात आहे. नागरिकांनी देखील तातडीच्या कामासाठीच पूर्वपरवानगी घेऊन यावे असे सांगण्यात आले आहे.

राज्य शासनाच्या आदेशान्वये कोरोना संसर्ग रोखण्यासाठी तळेगाव दाभाडे नगरपरिषदेने कार्यालयासाठी कडक निर्बंध लावण्यात आले आहेत.कार्यालयीन कामकाजासाठी  येणाऱ्यांना  कोरोना प्रतिबंधात्मक दोन डोस घेतल्याचे प्रमाणपत्र असणे अनिवार्य करण्यात आले आहे. त्यासाठी प्रमाणपत्र  तपासणीसाठी प्रवेशद्वारावर कर्मचा-यांची नेमणूक करण्यात आली आहे.

राज्य शासनाच्या आदेशान्वये नुकतेच तळेगाव दाभाडे नगर परिषदेतील कर्मचा-यांच्या कोरोना संदर्भात अँटीजेन चाचणी करण्यात आली. या चाचणीत तीन कर्मचाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे आढळून आले. त्यामुळे नगर परिषदेतील कर्मचाऱ्यांनी कोरोना. प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करणे आवश्यक असल्याचे मुख्याधिकारी सतीश दिघे यांनी सांगितले.

सद्या सर्वत्र कोरोना आणि ओमायक्रोनचा संसर्ग वाढत असून शासनाने कडक निर्बंध लागू केले आहेत. त्यामुळे नगरपरिषद कार्यालयाचे मुख्य दरवाजे बंद केले आहेत. दोन डोस घेतलेल्यानाच प्रवेश दिला जात आहे. तातडीच्या कामाव्यतिरिक्त नागरिकांना निर्बंध घातले आहेत. कार्यालयात येणे अत्यंत गरजेचे असेल तर  [email protected] या इमेलव्दारे अर्ज पाठवून परवानगी घेऊनच प्रवेश देण्यात येईल.

संबंधितांनी कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतले असणे बंधनकारक आहे. तसेच ज्या नागरिकांना घरपट्टी /पाणीपट्टी भरावयाची आहे. त्यांनी  talegaondabhademc.org या वेबसाईटवर ऑन लाईन पेमेंट करावे. अश्या सूचना प्रवेश व्दारावर लावण्यात आल्या आहेत.

तसेच ध्वनिक्षेपकाव्दारे  तळेगाव दाभाडे  चौका – चौकात कोरोना संक्रमण वाढू नये यासाठी नागरिकांना शासनाच्या नियम व आटी पाळण्याबाबत सूचना दिल्या जात आहेत. यामध्ये मास्क लावणे, सॅनीटायझर वापरणे,तसेच सुरक्षित अंतर ठेवणे. आदी सूचना दिल्या जात आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.