Talegaon Dabhade News : मावळ हद्दीत कडक बंदोबस्त,विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांवर पोलिसांची करडी नजर

एमपीसी न्यूज – मावळ – मुळशी प्रांताधिकारी राजेश जाधव यांच्या आदेशानुसार मावळ तालुक्यात शुक्रवारी (दि. 7) ते बुधवार (दि. 12) पर्यंत कडक लॉक डाऊन असल्याने येथील नगरपरिषद हद्दीत शिवाजी चौक,  तळेगाव स्टेशन चौक, जिजामाता चौक, लिंब फाटा व सोमाटणे टोल नाका येथे नाकाबंदी करुन वाहतूक बंद केली आहे.

_MPC_DIR_MPU_II

तळेगाव दाभाडे गावातील कडोलकर कॉलनी, हिंद माता भुयारी मार्ग व मस्करनिस कॉलनी येथील रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक भास्कर जाधव यांनी दिली.

बंदोबस्त करण्यासाठी पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, पोलीस उपायुक्त आनंद भोईटे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक भास्कर जाधव, पोलीस निरीक्षक शहाजी पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक दुर्गानाथ साळी, दिगंबर अतिग्रे, पोलीस उपनिरीक्षक दत्ताजी मोहिते, अनिकेत हिवरकर, ज्ञानेश्वर झोल,  महेश मतकर, प्राजक्ता धापटे, कर्मचारी स्वप्नील चांदेकर, प्रियांका सानप, गणेश आंबवणे,  संजय वाघमोडे, प्रशांत सोनवणे, नागनाथ खरात, सागर खेतमाळीस, कानिफनाथ मरखड ग्राम सुरक्षा दल शंकर जंगमस्वामी, गणेश निसाळ, भास्कर माळी आदी उपस्थित होते.

एसआरपीएफचे ५० जवान तसेच पोलीस अधिकारी व कर्मचारी सशस्त्र कडक बंदोबस्त करत आहेत. विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांवर पोलिसांची करडी नजर आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.