Wakad :पूर्ववैमनस्यातून एकाला दगडाने मारहाण

एमपीसी न्यूज – जुन्या भांडणाच्या रागातून तिघांनी मिळून एकाला मारहाण केली. तसेच जीवे मारण्याची धमकी दिली. ही घटना मंगळवारी सायंकाळी सहाच्या सुमारास गोडांबे कॉर्नर रहाटणी येथे घडली.

काशिनाथ विठोबा शिंदे (वय 55, रा. काळेपडळ, हडपसर) यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी राज अब्दुल पठाण (वय 19, रा. डोगरगाव, लोणावळा) याला अटक केली आहे. अन्य दोन अल्पवयीन मुलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अक्षय शिंदे असे मारहाण झालेल्या मुलाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा मुलगा अक्षय आणि आरोपी यांच्यामध्ये मागील काही दिवसांपूर्वी किरकोळ कारणांवरून भांडण झाले होते. त्या भांडणाचा राग मनात धरून आरोपीने त्याच्या दोन साथीदारांसह अक्षय याच्याशी भांडण केले. त्या भांडणात राज याने अक्षयला दगडाने मारहाण केली. यामध्ये अक्षय गंभीर जखमी झाला. यावरून त्याचे वडील काशीनाथ यांनी वाकड पोलिसात तक्रार दिली. पोलिसांनी राज याला अटक केली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक चव्हाण तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.