Pune : विधानभवनसमोर नागरिकाला मारहाण करून लुटणा-या चोराचा थरारक पाठलाग करून पकडले

एमपीसी न्यूज – पुण्यातील विधानभवनासमोर आज रात्री युनिट एकचे पोलीस उप निरीक्षक यांनी नागरिकाला मारहाण करून लुटणा-या एका चोरट्याला थरारक पाठलाग करून पकडले.

मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस उप निरीक्षक दिनेश पाटील हे पेट्रोलिंग करीत असताना त्यांना विधान भवन जवळील रोडवर एक इसम मदतीसाठी आरडाओरडा करीत असल्याचे दिसले. त्यावेळी ते ताबडतोब या इसमाकडे जाऊन त्याची विचारपूस केली असता दोन चोरट्याने मारहाण करून त्याला लुटल्याचे सांगितले.

पाटील यांनी लगेचच त्यांना आपल्या गाडीवर बसवले आणि चोराचा पाठलाग सुरू केला. हे दोघे आरोपी विधानभवनाच्या दिशेने पळून जात असल्याचे दिसले. यातील एका आरोपीस पकडण्यात पाटील यांना यश आले. त्यांनी आपला जीव धोक्यात टाकून या आरोपीला पकडले.

या आरोपीकडून सात हजार रुपये किमतीचा एक लीफोन कंपनीचा मोबाईल, दोन हजार रुपयांचा एक सॅमसंग कंपनीचा मोबाईल आणि एक हजार रुपये किमतीची ब्याग आणि कपडे एवढा ऐवज हस्तगत केला.

मात्र, दुसरा आरोपी रोख रकमेसह फरार झाला. पोलीस त्याचा शोध घेत आहे. दरम्यान, पकडलेल्या आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील कारवाईसाठी त्याला बंडगार्डन पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.