Bhosari : किरकोळ वादातून तरुणावर कोयत्याने वार

एमपीसी न्यूज – किरकोळ वादातून तीन जणांनी मिळून एका तरुणावर कोयत्याने सपासप वार केले. यामध्ये तरुण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना बुधवारी (दि. 29) रात्री नऊच्या सुमारास बापूजीबुवा चौकाजवळ भोसरी येथे घडली.

अक्षय बाळू कंद (वय 26, रा. भोसरी), असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्याने याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अमोल जानकर (वय 27, रा. भोसरी) आणि त्याचे दोन साथीदार यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्षय आणि आरोपी यांच्यामध्ये बुधवारी रात्री नऊच्या सुमारास किरकोळ कारणावरून भांडण झाले. या भांडणाच्या रागातून आरोपींनी अक्षय याच्यावर लोखंडी कोयत्याने सपासप वार केले. तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यामध्ये अक्षय गंभीर जखमी झाला. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.