Pune : स्थायी समिती सदस्य पदासाठी जोरदार ‘लॉबिंग’

एमपीसी न्यूज – पुणे महापालिकेच्या स्थायी समिती सदस्य पदासाठी सर्वच पक्षात जोरदार ‘लॉबिंग’ सुरू आहे.  यामध्ये सर्वाधिक इच्छुक भाजपमध्ये आहेत.

भाजपतर्फे नगरसेवक आदित्य माळवे, धनराज घोगरे, प्रवीण चोरबेले, महेश लडकत, स्वाती लोखंडे, अर्चना तुषार पाटील, राजश्री काळे, डॉ. श्रद्धा प्रभुणे, माधुरी सहस्त्रबुद्धे, उज्वला जंगले इच्छुक आहेत. राष्ट्रवादीतर्फे नगरसेवक प्रकाश कदम, सचिन दोडके, योगेश ससाणे, गफूरभाई पठाण, प्रदीप गायकवाड, नागरसेविका सायली वांजळे, सुमन पठारे, शिवसेनेतर्फे बाळा ओसवाल, पल्लवी जावळे, तर काँग्रेसतर्फे नगरसेवक रवींद्र धंगेकर यांच्या नावाची स्थायी समिती सदस्य पदासाठी चर्चा आहे. दि. 17 फेब्रुवारीला होणाऱ्या सर्वसाधारण सभेत या सदस्यांची निवड होणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like