Pune Gramin News : पुण्यासह अहमदनगर जिल्ह्यात धुमाकूळ घालणारे अट्टल दरोडेखोर जेरबंद

एमपीसी न्यूज : पुणे जिल्ह्यासह अहमदनगर जिल्ह्यातही धुमाकूळ घालणाऱ्या दोन अट्टल दरोडेखोरांच्या टोळीला जेरबंद करण्यात पुणे ग्रामीण पोलिसांना अखेर यश आले. या दरोडेखोरांनी मागील पाच महिन्यात ओतूर, आळेफाटा, मंचर लोणीकंद, पारनेर या भागात इतर साथीदारासोबत घरफोड्या केल्याचे कबूल केले आहे.

विशाल उर्फ कोंग्या नरेश काळे ( वय 26 वर्षे रा. निघोज ता.पारनेर जि. अहमदनगर, दिपक उर्फ आशिक आझाद काळे (वय 25 वर्षे रा. निघोज ता. पारनेर जि.अहमदनगर) अशी आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 14 डिसेंबर रोजी आळेफाटा पोलीस स्टेशनच्या हद्दीत भरल्या एका घरफोडीचा तपास सुरू असताना वरील आरोपींची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली होती. यातील आरोपी विशाल ऊर्फ कोंग्या काळे हा टाकळीहाजी परिसरात येणार असल्याची माहिती खबऱ्यामार्फत पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून त्याठिकाणी आलेल्या वरील दोन आरोपींना अटक केली.

त्यांच्याकडे केलेल्या अधिक चौकशीत त्यांनी पुणे जिल्ह्यासह नगर जिल्ह्यातही आठ ठिकाणी चोऱ्या केल्याची कबुली दिली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.