Pune District Football Association : साई स्पोर्टस, बेटा संघांचा संघर्षपूर्ण विजय

एमपीसी न्यूज : आज पुणे जिल्हा फुटबॉल संघटनेच्या (Pune District Football Association) नव्या मोसमातील लीगमध्ये साई स्पोर्टस, बेटा ‘अ’ आणि लौकिक एफए संघांनी पूर्ण गुण जरुर मिळवला. पण, त्यासाठी त्यांना प्रतिस्पर्ध्यांचा कडवा प्रतिकार सहन करावा लागला.

‘ब’ गटातील सामन्यात साई स्पोर्टंसने व्हिन्सेंट ओल्ड बॉईज संघटनेचा 1-0 असा पराभव केला. सामन्याच्या 28व्या मिनिटाला सतिश भोईटेने हा एकमात्र गोल नोंदवला. त्यानंतर ‘सी’ गटात लौकिक एफए संघाने दोन्ही सत्रात एकेक गोल करताना इनव्हेडर्सचा 2-0 असा पराभव केला. आशुतोष कांबळे याने प्रथम 10व्या, तर रोहन सुनारने 49व्या मिनिटाला गोल केला.

RR vs CSK : चेन्नईवर 5 गडी राखून सुपर विजय मिळवत राजस्थान रॉयल्सने  गाठले द्वितीय स्थान

बेटा ‘अ’ संघाने पुणे सोशल संघटना (Pune District Football Association) संघाचा 2-1 असा पराभव केला. सामन्यातील तीनही गोल उत्तरार्धात झाले. ‘सी’ गटातील या सामन्यात पुर्वार्ध कंटाळवाणा झाला. एकालाही गोल करण्यात यश आले नाही. सामन्याच्या उत्तरार्धात 43व्या मिनिटाला पहिला गोल आशुतोष धनवाड याने बेटा ‘अ’ साठी केला. त्यानंतर पाचच मिनिटांनी आदित्य आवटेने त्यांची आघाडी वाढवणारा गोल केला. सामन्याच्या 55व्या मिनिटासला फुरकन शेख याने गोल करून पूना सोशलसाठी पिछाडी भरून काढली.

त्यापूर्वी ‘अ’ गटातील सामन्यातच गॅलाक्टिक संगाने अखिल भुसारी कॉलनी एफसीचा प्रतिकार 2-1 असा मोडून काढला. असिथ चव्हाण याने 14, श्रेयस शेवाटे याने 37व्या मिनिटाला विजयी संघासाठी गोल केले. पराभूत संघाचा एकमात्र गोल टिमोथी काम याने 47व्या मिनिटाला केला.

स्पर्धेतील 14 वर्षांखालील गटात फन फिटनेस एफए, लौकिक एफए आणि रायझिंग पुणे एफसी संघांनी दणदणीत विजयासह आपली आगेकूच कायम राखली. ‘अ’ गटात फन फिटनेस संघाने व्हिजन स्पोर्टसचा 7-0, ड गटात लौकिकने स्पोर्टिव एफएचा 6-0 आणि रायझिंग पुणे एफसी संघाने मॅथ्यू एफएचा 5-0 असा पराभव केला.

DC vs MI : मुंबईने दिल्ली संघाला 5 गडी राखुन केले पराभूत

निकाल –

सप महाविद्यालय मैदान – तृतिय श्रेणी – Pune District Football Association

गट ब – मोमिनपुरा एफसी पुढे चाल वि. परदेशी एफसी
साई स्पोर्टस 1 (सतिश भोईटे 28वे मिनिट) वि. व्हिन्सेंट ओल्ड बॉईज असोशिएशन 0
गट सी – लौकिक एफए 2 (आशुतोष कांबळे 10वे, रोहन सुनार 49वे मिनिट) वि.वि. इनव्हेडर्स 0
बेटा ए 2 (आशुतोष धनवाड 43वे, आदित्य आवटे 48वे मिनिट) वि.वि. असोशिएशन पुणे सोशल ब 1 (फुरकन शेख 55वे मिनिट)
गट अ – गॅलाक्टिक वॉरियर्स 20(असिथ चव्हाण 14वे, श्रेयस शेवाटे 37वे मिनिट) वि.वि. अखिल भुसारी कॉलनी एफसी 1 (टिमोथी काम 47वे मिनिट)

एसएसपीएमएस मैदान -14 वर्षांखालील
गट ब – रायझिंग पुमे एफसी 5 (दुर्वेश महाजन30+1ले, 49वे, वेदांत गुप्ता 37वने, आर्य देशमुख 48वे मिनिट) वि.वि. मॅथ्यू एफए 0
गट सी – स्पोर्टिको एफए 3 (यशराज सावंत 13वे, 49वे मिनिट, विदित बगाडे 52वे मिनिट) वि.वि. ग्रीनबॉक्स चेतक एफए 1 (दर्श बरडे 58वे मिनिट)
गट डी – लौकिक एफए 6 (हर्षिसल पांड्या 5वे, चेतन सिंग 23वे, अथर्व इंगवले 24, 41, 44वे मिनिट, आदित्य कांबळे 30वे मिनिट) वि.वि. स्पोर्टिव एफए 0
गट अ – फन फिटनेस एफए 7 (प्रणन शेट्टी 16वे, रचित भटेवरा 21वे, अर्जुन देशपांडे 26, 50वे, रियान जैन 29, 41, 49वे मिनिट) वि.वि. व्हिजन स्पोर्टस: 0.

गट -बी: गेम ऑफ गोल एफसीसी: 5 (रणवीर बैस 21वे, 26वे, 35वे, 55वे; नीलकंठ मोरे 43वे) बीटी दुर्गा एफए: 2 (श्लोक भिसे 23वे, रेहान शेख 25वे) पूल-डी: रायन एफए: 3 (तापप्राय बोडके) ३४वे; फैज शेख ५५वे; विक्रांत बोदाडे ५७वे) बीटी जुन्नर तालुका: 1 (शंतनू वाघमारे 21वे)

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.