Pimpri : विद्यार्थी करणार अवयवदानाबद्दल जनजागृती; लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड घेणार दखल

रामकृष्ण मोरे महाविद्यालयात रोटरीचा उपक्रम

एमपीसी न्यूज – रोटरी क्लब ऑफ चिंचवड, रोटरी क्लब ऑफ पिंपरी, रोटरी क्लब ऑफ प्राधिकरण, इनरव्हील क्लब ऑफ पिंपरी आणि प्रा. रामकृष्ण मोरे महाविद्यालयाचा इंग्रजी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने अवयवदान मोहीम राबविली जाणार आहे. या मोहिमेत जास्तीत जास्त विद्यार्थी, पालक आणि नागरिकांना अवयवदानासाठी प्रोत्साहित केले जाणार आहे. या मोहिमेची लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद केली जाणार आहे. उपस्थितांनी अवयवदान करण्याची शपथ घेतली.

गुरुवार (दि. 9) रोजी प्रा. रामकृष्ण मोरे महाविद्यालय, आकुर्डी येथे हा उपक्रम सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत राबविण्यात येणार असल्याची माहिती रोटरी क्लब ऑफ चिंचवडचे अध्यक्ष मल्लिनाथ कलशेट्टी यांनी दिली. अवयवदान मोहिमेच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी रोटरी क्लब ऑफ पिंपरीचे अध्यक्ष नितीन ढमाले, रोटरी क्लब ऑफ प्राधिकरणच्या अध्यक्षा वैजयंती आचार्य, इनरव्हील क्लब ऑफ पिंपरीच्या अध्यक्षा मनीषा समर्थ, मेहुल वर्मा, युथ डायरेक्टर शिल्पागौरी गणफुले, प्राचार्य डॉ. मनोहर चासकर, इंग्रजी विभाग प्रमुख डॉ. मंजुषा धुमाळ आदी उपस्थित होते.

नितीन ढमाले म्हणाले, “पुणे आणि पिंपरी-चिंचवड  शहरे सुसंस्कृत आणि पुढारलेली शहरे म्हणून ओळखली जातात. विविध उल्लेखनीय उपक्रमांमुळे ही ओळख निर्माण झाली आहे. अवयवदान मोहीम यशस्वी आणि मोठ्या प्रमाणात राबवून ही ओळख आपल्याला कायम करण्याची संधी मिळाली आहे. विद्यार्थी हा देशाचा कणा आहे. विद्यार्थ्यांनी जर संकल्प केला तर तो संकल्प विद्यार्थी तडीस नेतातच. विद्यार्थ्यांनी या मोहिमेत स्वतः सहभागी होऊन आपल्या पालकांना, तसेच आसपासच्या नागरिकांना अवयवदानासाठी प्रोत्साहित करण्याची गरज आहे. एका व्यक्तीच्या अवयव दानामुळे सात जणांचे प्राण वाचू शकतात. त्यामुळे एका व्यक्तीमध्ये त्याच्या मृत्यू पश्चात सुद्धा सात माणसांना जगवण्याची ताकद असते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.