Pimple Nilakh News : पिंपळेनिलख येथे सोमवारी विद्यार्थी गुणगौरव सोहळा, व्याख्यान

एमपीसी न्यूज – सचिन साठे सोशल फाउंडेशनच्यावतीने येत्या सोमवारी म्हणजेच स्वातंत्र्यदिनी दहावी आणि बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमास प्रसिद्ध अभिनेते व दिग्दर्शक प्रवीण तरडे विद्यार्थ्यांशी संवाद साधणारा असून प्रा. नितीन बानगुडे पाटील यांचे व्याख्यान यावेळी होणार आहे.

पिंपळेनिलख, मुख्य बसस्टॉप, महापालिका शाळेसमोर सोमवारी सकाळी दहा वाजता हा कार्यक्रम होणार आहे. 85 टक्केपेक्षा जास्त गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांना एक स्मार्ट वॉच, एक स्कूल बॅग आणि सन्मान चिन्ह तसेच इतर पास झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना स्कूल बॅग आणि स्मृतिचिन्ह देऊन गौरवण्यात येणार आहे.तसेच विविध क्षेत्रात आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवणाऱ्या मान्यवरांचाही सत्कार करण्यात येणार आहे.

यामध्ये डॉ.दिनकर दादोबा मालेकर, डॉ.जयसिंग कदम, डॉ.बाळकृष्ण रंगदळ, शांताराम साठे, भरत इंगवले, अनिल संचेती, कैलाससिंह चव्हाण, वनिता माकर, विजय पाटुकले, शंकर तांदळे, साई कवडे सनी शिंदे यांचा सत्कारमूर्तींमध्ये समावेश आहे. तसेच पिंपळवण वृक्ष संवर्धन ग्रुप आणि इंडियन सायकलिंग क्लब या संस्थांचाही सत्कार करण्यात येणार आहे, अशी माहिती कार्यक्रमाचे आयोजक सचिन साठे मित्र परिवार यांनी प्रसिद्धीस दिली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.