Pimpri : माजी विद्यार्थी मेळावा व स्नेहसंमेलन उत्साहात

एमपीसी न्यूज –  “अशी पाखरे येती आणि स्मृती ठेवुनी जाती.”  या स्मृतीला उजाळा देण्यासाठी ही पाखरे परत एकदा शाळेच्या प्रांगणात उतरली. औचित्य होते. रविवार (दि. ४ नोव्हेंबर)  झालेल्या माजी विद्यार्थी मेळाव्याचे.थेरगाव येथील खिंवसरा पाटील शिक्षण संकुलमध्ये माजी विद्यार्थी मेळावा व स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले होते.

क्रांतिवीर चापेकर स्मारक समितीचे कार्यवाह अॅड.सतीश गोरडे, अध्यक्ष गिरीश प्रभुणे, अभिनेत्री सेजल शेख सदस्य आसाराम कसबे, अशोक पारखी, गतीराम भोईर, शरद जाधव, संजय कुलकर्णी,नितीन बारणे, शकुंतला बंसल, निता मोहिते, सायली गोरडे, पिंपरी चिंचवड बार असोशियनचे सुनील कडूसकर, माजी शिक्षिका शालिनी म्हात्रे, प्रमोदिनी बुटे, शिरूर तालुक्यातील माजी आमदार अशोक बापू पवार, राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त घाट चित्रपटाचे दिग्दर्शक राज गोरडे, व्यवस्थापक सिध्देश्वर इंगळे  व अभिनेत्री समृद्धी राजपूत, आदी उपस्थित होते.
आर्यन हंकारे व सिद्धेश केसकर यांनी क्रांतिवीर चापेकर व राजर्षी शाहू महाराज यांच्यावर पोवाडा सादर केला. कार्यक्रमाची सुरुवात पाहुण्यांच्या हस्ते भारतमाता पूजन व दुर्ग पूजनाने झाली. माजी विद्यार्थ्यांना परत एकदा शाळेचा अनुभव देण्यासाठी राष्ट्रगीत व सत्यनिष्ठा प्रतिज्ञा घेण्यात आली.यानंतर इयत्ता सातवी ब ची विद्यार्थिनी सायली पारधे हिने तिच्या मनोगतातून शाळेविषयीची कृतज्ञता व्यक्त केली. यानंतर राहुल सरोदे, बेलाजी पात्रे, शिल्पा कडू, जयप्रकाश सागरे, सुदर्शन कारखिले  या माजी विद्यार्थ्यांनी  मनोगत व्यक्त केले.

क्रांतिवीर चापेकर स्मारक समितीचे सदस्य आसारामजी कसबे यांनी माजी विद्यार्थ्यांसाठी स्वयंरचित गीत “हे ठिकाण मानाचे, ज्ञानमंदिर हे ज्ञानाचे” असे बोल असणारे गीताचे गायन केले.  क्रांतिवीर चापेकर स्मारक समितीचे अध्यक्ष व कार्यक्रमाचे अध्यक्ष गिरीश प्रभुणे  म्हणाले की. ,मराठी शाळेत शिकणारा व संस्कार झालेला विद्यार्थी कधीच माजी विद्यार्थी होऊ शकत नाही. कारण मनुष्य आजीवन काही ना काही शिक्षण घेतच असतो. त्यांनी माजी विद्यार्थ्यांना आव्हान केले की, जरी इंग्रजी शाळा वाढत असल्या तरी आपण ठरवले तर आपली ही शाळा उत्तम सोयी सुविधा असणारी, पिंपरी चिंचवड मधील एक नंबरची मराठी शाळा बनवू व शाळेचे भवितव्य उज्वल करू.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे शिरूर तालुक्यातील माजी आमदार अशोकबापू पवार म्हणाले की, ज्या शाळेत आपण शिकलो, घडलो तेथे काहीतरी करण्याचे सौभाग्य तुम्हाला लाभले आहे शिक्षणाने क्रांती होते. कार्यक्रमाचे विशेष आकर्षण असणारी अभिनेत्री समृद्धी राजपूत म्हणाली की,  आपल्याला प्रत्येकाकडून प्रेरणा मिळत असते ती घ्या. नेहमी हसत खेळत रहा.  आपल्या घाट या चित्रपटाच्या टीम कडून त्यांनी दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. यानंतर पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून  साजरा करण्यात आला. बालवाडी प्रमुख हुले यांनी “आली माझ्या घरी ही दिवाळी” हे गीत गायिले.

यानंतर माजी विद्यार्थ्यांनी काही सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण केले त्यामध्ये वृषाली पुरोहित हिने स्वयंरचित *भेट* कविता गायली. मुकेश चौधरी व त्याचे सहकारी मित्र यांनी बेलाजी पात्रे लिखित *जस्सी का स्वयंवर* नाट्य सादर केले. गणेश मोरे यांनी फ्युजन गीत सादर केले. सुभाष चव्हाण यांनी पिंपरी चिंचवड ची माहिती देणारा पोवाडा सादर केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक  प्रा. नीता मोहिते यांनी केले. सूत्रसंचालन  सुनील गव्हाणे यांनी केले. आभार पुष्पा जाधव यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.