Pune News : हडपसर परिसरातील नामांकित शाळेत वर्ग शिक्षकाकडून विद्यार्थिनीचा विनयभंग

एमपीसी न्यूज : शहराच्या हडपसर परिसरातील एका नामांकित शाळेत वर्गशिक्षकानेच विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. एका विद्यार्थिनीने दिलेल्या तक्रारीनंतर संबंधित शिक्षकाविरुद्ध हडपसर पोलीस ठाण्यात लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, नोव्हेंबर 2019 ते फेब्रुवारी 2020 दरम्यान ही घटना घडली होती. आरोपी शिक्षकाने या विद्यार्थिनीला मोबाईल घेऊन दिला आणि तिच्याशी जवळीक साधली. शाळेत असताना तो विविध कारणे काढून या विद्यार्थिनीला बोलावून घेत असे आणि तिच्या अंगाला स्पर्श करत होता. मुलीने आता हा प्रकार आपल्या कुटुंबियांना सांगितला. त्यानंतर मुलीच्या कुटुंबियांनी हडपसर पोलिसांकडे तक्रार अर्ज दिला होता.

या तक्रारीच्या आधारे हडपसर पोलिसांनी संबंधित शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. त्यांनी आणखी काही विद्यार्थिनिसोबत असा प्रकार केला का त्याचा तपासही हडपसर पोलिस करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.