Hadapsar : विद्यार्थ्यांचे लैंगिक शोषण करणा-या क्रिडाशिक्षकाला अटक

एमपीसी न्यूज- हडपसर येथील ‘लेक्सिकन’ या इंग्रजी माध्यमाच्या शाळेच्या क्रिडाशिक्षकाने शाळेतील चार ते पाच विद्यार्थ्यांसोबत अश्लील चाळे करून लैंगिक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.

आनंद काळे (वय 40) असे अटक करण्यात आलेल्या शिक्षकाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काळे हा क्रिडाशिक्षक म्हणून काम करतो. काळे हा मुलांच्या व त्यांच्या पालकांच्या संपर्कात असल्याने त्याने त्यांचा विश्वास संपादन केला होता. शाळेच्या जवळच राहत असल्याने तो मुलांना घरी बोलावून आणि शाळेच्या आवारात त्यांच्याशी अश्लील चाळे करीत असल्याचे पीडित मुलांनी पोलिसांना सांगितले. हा प्रकार विद्यार्थ्यांनी घरी सांगितल्यावर त्यांच्या पालकांनी पोलिसांनी या प्रकाराबाबत सांगितले. पालकांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी शाळेत जाऊन आरोपीला ताब्यात घेतले आहे त्यामुळे शिक्षकाला ताब्यात घेऊन त्याच्यावर बाललैगिक अत्याचार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी पुढील तपास हडपसर पोलीस करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.