Chinchwad : थेरगावमध्ये प्लास्टिक विरोधात विद्यार्थ्यांची जनजागृती

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 24 मधील  गणेशनगर डांगे चौक परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. 400 विद्यार्थ्यांनी प्लास्टिक बंदी व स्वच्छतेविषयक जनजागृती केली.

स्वच्छ भारत व स्वच्छ महाराष्ट्र अभियान अंतर्गत खिंवसरा पाटील विद्या मंदिर येथील 400 विद्यार्थ्यांनी प्लास्टिक विरोधात जनजागृती केली. त्यामध्ये प्रभात फेरी व  पथनाट्य सादरीकरण करण्यात आले. तसेच  गणेशनगर भागातील शिव पार्वती, माहेश्वरी, शिवसंकल्प इत्यादी महिला  बचत गटातील 60 महिलांनी स्वच्छता अभियानाअंतर्गत डांगे चाक येथे स्वछता मोहिमेत सहभाग नोंदवला. तसेच त्यांच्याकडून नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली. व्यावसायिकांना प्लास्टिक पिशवी बंदीबाबत पत्रकाचे वाटप करून प्लास्टिक पिशवी बंदी बाबत सूचना देण्यात आल्या.

या मोहिमेत खिंवसरा पाटील विद्यामंदिर शाळेचे मुख्यध्यापक नटराज जगताप, त्यांचे सर्व सहकारी शिक्षक व शिक्षिका, विद्यार्थी, सहाय्यक आरोग्य निरीक्षक सुरेश चन्नाल, कुलकर्णी,  बेद, आरोग्य निरीक्षक शेखर निंबाळकर, सतिश इंगेवाड, आरोग्य कर्मचारी अरुण राऊत, स्वदेश साळुंखे, अभय दारोळे, प्रशांत पवार, अनिल डोंगरे, चाबुकस्वार, विजया जाधव 59 कर्मचारी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.