BNR-HDR-TOP-Mobile

Talegaon Dabhade : विद्यार्थ्यांनी आवड, क्षमता व भविष्यातील संधी यांचा विचार करून विद्याशाखा निवडावी – डॉ. वाडदेकर

एमपीसी न्यूज – विद्यार्थ्यांनी स्वतःची आवड, क्षमता व भविष्यातील संधी यांचा विचार करून विद्याशाखा निवडावी, असा सल्ला शिक्षणतज्ज्ञ व करिअर मार्गदर्शक डॉ. आनदंजी वाडदेकर यांनी दिला. 

तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या शिक्षण, क्रीडा व सांस्कृतिक कार्य समितीच्या वतीने शहरातील माध्यमिक व उच्चमाध्यमिक शाळा व महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी तळेगाव दाभाडेच्या नगराध्यक्षा चित्राताई जगनाडे होत्या. त्यावेळी विरोधी पक्षनेत्या हेमलता खळदे, नगरसेविका संध्याताई भेगडे, विभावरी दाभाडे, काजल गटे, शोभा भेगडे, महिला ब बालकल्याण समितीच्या सभापती प्राची हेंद्रे, शिक्षण समितीच्या सभापती कल्यना भोपळे, शिक्षण समितो सदस्य सुनील कारंडे, अॅड. श्रीराम कुबेर, पत्रकार सुनील वाळुंज, विवेक इनामदार, मनोहर दाभाडे, प्रशासन अधिकारी संपत गावडे, नगरसेवक अरूण भेगडे, संतोष शिंदे, अमोल शेटे, सामाजिक कार्यकर्ते संदीप जाधव, चारुशीला काटे, सर्व शाळांचे मुख्याध्यापक. शिक्षकवृंद गुणवंत विद्यार्थी व पालक उपस्थित होते.

केवळ चांगले गुण मिळाले म्हणून म्हणून विद्यार्थ्यांनी विज्ञान शाखेकडे जाऊ नये. आवड, क्षमता आणि त्या विद्याशाखेला जाण्यामुळे भविष्यात उपलब्ध होणाऱ्या संधी यांचा विचार करून विद्यार्थ्यांनी विद्याशाखा निवडावी तसेच केवळ गुण मिळविण्याऐवजी उत्कृष्ट होण्याकडे भर द्यावा. त्यामुळे त्यांना करियरमध्ये नेत्रदीपक यश प्राप्त होऊ शकते, असा कानमंत्र डॉ. वाडदेकर यांनी विद्यार्थ्यांना दिला.

शहरातील सर्व शाळांमधील दहावी व बारावीमध्ये प्रथम, व्दितीय व तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा तसेच शंभर टक्के निकाल लागलेल्या शाळा व महाविद्यालयांचा यावेळी सत्कार करण्यात आला. तळेगाव शहरात दहावीच्या परीक्षेत सर्वप्रथम आलेल्या तुषार घोरपडे व सरस्वती विद्या मंदिरने यंदा फिरता चषक पटकावला.

कार्यक्रमाचा सुरूवात सरस्वतीपूजन व दीपप्रज्वलनाने झाली. नगरपरिषद माध्यमिक शाळा क्रमांक २ च्या विद्यार्थिनींनी ईशस्तवन व स्वागतगीत सादर केले.  चित्रा जगनाडे यांनी मनोगतात सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कल्पना भोपळे यांनी केले. शिक्षण सामतीचे सदस्य अॅड श्रीराम कुबेर यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरेखा जाधव व सुवर्णा कुंवर यांनी केले.

HB_POST_END_FTR-A2

.