Lonavala : विद्यार्थ्यांनी घेतली स्वच्छतेची शपथ

एमपीसी न्यूज – स्वच्छता हीच सेवा हे घोषवाक्य घेऊन लोणावळा नगरपरिषदेने स्वच्छ सर्वेक्षण 2019 चे रणशिंग फुंकले आहे. याचाच एक भाग म्हणून आज लोणावळा शहरातील सर्व शाळांच्या विद्यार्थ्यांनी शाळेपासून लोणावळा नगरपरिषदेच्या पंडीत नेहरु विद्यालय पटांगणापर्यत स्वच्छतेची फेरी काढत त्याठिकाणी स्वच्छतेची सामूहिक शपथ  घेतली.

नगराध्यक्षा सुरेखा जाधव, उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी, मुख्याधिकारी सचिन पवार, स्वच्छता व आरोग्य समिती सभापती बिंद्रा गणात्रा, पाणी पुरवठा समिती सभापती पुजा गायकवाड यांच्यासह विविध शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक व विद्यार्थी यावेळी उपस्थित होते.

लोणावळा शहराला कचराकुंडीमुक्त बनविण्याकरिता सर्वांनी सामुहिक प्रयत्न करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. यासोबत लोणावळा शहराला स्वच्छ सुंदर व कचरामुक्त बनविण्याकरिता घरातील कचरा हा घंटागाडीत टाकणे, ओला व सुका कचरा वर्गीकरण करुन देणे, स्वच्छतागृहांचा वापर करणे, आपले घर व परिसर हा कचरामुक्त ठेवणे, सुक्या कचर्‍यापासून घरच्या घरी कंपोस्ट खत तय‍ार करणे याप्रकारची सामुहिक शपथ यावेळी घेण्यात आली.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन राजेंद्र दिवेकर यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.