Chinchwad : पिंपरी चिंचवड विद्यापीठाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मिळणार दर्जेदार शिक्षण – हर्षवर्धन पाटील

एमपीसी न्यूज : : पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) 33 वर्षांपासून शैक्षणिक (Chinchwad) सेवा देण्याचे कार्य करीत आहे. पीसीईटी अंतर्गत शैक्षणिक संस्थांमधून आतापर्यंत हजारो विद्यार्थी शिक्षण घेऊन बाहेर पडले आहेत. आता संस्थेने एक पाऊल पुढे टाकत पिंपरी चिंचवड विद्यापीठ (पीसीयु) सुरू केले आहे. साते, वडगांव मावळ येथे विस्तीर्ण क्षेत्रात अत्याधुनिक शैक्षणिक सुविधांनी युक्त सुसज्ज, दर्जेदार शिक्षण विद्यार्थ्यांना मिळणार आहे, असे पीसीयुचे कुलपती हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले.

माध्यम प्रतिनिधींनी नव्याने सुरू झालेल्या पिंपरी चिंचवड विद्यापीठास (पीसीयु) बुधवारी भेट दिली. यावेळी कुलपती हर्षवर्धन पाटील यांनी उपस्थितांशी संवाद साधला. पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई आदी उपस्थित होते.

16, जानेवारी 2023 मध्ये पीसीईटीच्या पिंपरी चिंचवड विद्यापीठाची घोषणा शासनाने केली; आणि सहा मे 2023 मध्ये मान्यता मिळाली. यानंतर त्वरेने निर्णय घेत विद्यापीठाच्या प्रत्यक्ष कामास सुरुवात झाली. विविध अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया राबविताना देशभरातून विद्यार्थी पालकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. सुमारे 93 हजार विद्यार्थ्यांनी चौकशी तर दहा हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्ज भरले त्यातील दीड हजार विद्यार्थ्यांनी विविध अभ्यासक्रमांना प्रवेश घेतला, असे विद्यापीठाने अनेक अभ्यासक्रम सुरू केले आहेत.

यामध्ये प्रामुख्याने एमबीए इंटरनॅशनल, इंटरनॅशनल स्टडी टूर सॅप सर्टिफिकेशन, तसेच दुहेरी स्पेशलायझेशन – विपणन, वित्त, व्यवसाय विश्लेषण, माहिती तंत्रज्ञान, डिजिटल मार्केटिंग आणि मीडिया व्यवस्थापन, मानव संसाधन व्यवस्थापन, कृषी व्यवसाय व्यवस्थापन, फार्मास्युटिकल व्यवस्थापन, दहा पेक्षा अधिक मूल्यवर्धित प्रमाणपत्रे, नोकरी सुरक्षित कार्यक्रम. संगणक शास्त्र, व्यवस्थापन, आहारशास्त्र, क्लिनिकल मानसशास्त्र अन्य अभ्यासक्रम (Chinchwad) फार्मास्युटिकल, संगणक विज्ञान, एआय आणि एमएल, मास मीडिया आणि पत्रकारिता, डिजिटल फिल्म मेकिंग, कायदा, डिझाइन, आरोग्य विज्ञान, , कला (इंग्रजी, अर्थशास्त्र, मानसशास्त्र, समाजशास्त्र इ.) व पीएचडी – आदी अभ्यासक्रमांचा समावेश आहे.

गुणवंत, होतकरू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती –

पीसीयु प्रतिभावान, गुणवंत होतकरू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती योजना राबविण्यात आली आहे. आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती. आफ्रिका, दक्षिण आफ्रिका, पश्चिम आफ्रिका, सार्क देश (अफगाणिस्तान, बांगलादेश, भूतान, भारत, मालदीव, नेपाळ आणि श्रीलंका) आणि मध्य-पूर्वेकडील आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती. भारतातील विशिष्ट प्रदेशातील विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती. ज्या विद्यार्थ्यांनी त्यांचे पालक गमावले आहेत आणि आर्थिक अडचणींचा सामना करत आहेत त्यांच्यासाठी शिष्यवृत्ती. विविध प्रवाहातील शैक्षणिक कामगिरीवर आधारित शिष्यवृत्ती. गुणवंत एमबीए विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती. या योजनेव्दारे ट्युशन फी मध्ये गुणवत्तेनुसार सवलत दिली जाते असे पाटील यांनी सांगितले.

एस बी पाटील यांनी लावलेल्या रोपट्याचे वटवृक्षात रूपांतर – माजी खासदार कै. शंकरराव बाजीराव पाटील यांनी सुरू केलेल्या पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या रोपट्याचे आता वटवृक्षामध्ये रूपांतर झाले आहे.

पीसीईटीच्या शैक्षणिक संस्थां मधून व्यवस्थापन, अभियांत्रिकी, वास्तुशास्त्र, तंत्रनिकेतन, विविध विषयांचे व्यावसायिक पदवी अभ्यासक्रम तसेच इंग्रजी माध्यमाच्या शाळा, महाविद्यालय अशा शैक्षणिक अभ्यासक्रमांची अद्ययावत व्यवस्था आकुर्डी, रावेत, तळेगाव, साते, वडगांव मावळ परिसरामध्ये विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहे.

उत्तम कॅम्पस प्लेसमेंटसाठी प्रसिद्ध –

पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट ही शिस्तबद्ध शैक्षणिक वातावरण आणि राज्यातील उत्तम कॅम्पस प्लेसमेंट यासाठी सुप्रसिद्ध असलेली संस्था आहे. संशोधनासाठी अद्ययावत प्रयोगशाळा आणि तज्ज्ञ मार्गदर्शक आहेत.

‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड’ने घेतली दखल –

संशोधन क्षेत्रात मागील काही वर्षांमध्ये एक मोठी झेप संस्थेने घेतली असून सुमारे अडीचशे कॉपीराइट्स आणि सुमारे पाचशे पेटंट्स संस्थेने मिळवले आहे. यासाठी ‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड’ मध्ये या कार्याची दखल घेण्यात आली आहे.

सुसज्ज शैक्षणिक सुविधा –

पीसीयु मध्ये डिजिटल क्लासरूम’ वाय-फाय कॅम्पस लायब्ररी, अद्ययावत प्रयोगशाळा, सर्व संगणक प्रणाली, ईआरपी यंत्रणा अशा सुसज्ज शैक्षणिक सुविधा आहेत. त्यासोबत विद्यार्थी – विद्यार्थिनींसाठीची स्वतंत्र होस्टेल्स, मेस, दुरून येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी बस व्यवस्था या आवश्यक सुविधा उपलब्ध आहेत.

आंतरराष्ट्रीय स्तरावर नावलौकिक –

दर्जेदार शिक्षण, उत्तम प्लेसमेंट, शैक्षणिक गुणवत्ता या त्रिसूत्री मुळे संस्थेने आंतरराष्ट्रीय पातळीवर नावलौकिक मिळवला आहे. तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर 34 पेक्षा अधिक विद्यापीठांशी शैक्षणिक सामंजस्य करार केले आहेत. यामध्ये यूएसए, रशिया, युके, मलेशिया, थायलंड, इटली, आयर्लंड, जपान, डेन्मार्क, नेदरलँड, व्हिएतनाम इत्यादी देशांमधील विद्यापीठांचा समावेश आहे.

Pimpri : अयोध्येतील मंदिर हे फक्त राम मंदिर नसून राष्ट्र मंदिर –  माहेश्वर मराठे

पीसीईटीचा केंद्र सरकारकडून सन्मान –

मागील वर्षी केंद्र सरकारने पीसीईटीला देशातील ‘उत्कृष्ट कॅम्पस’ म्हणून सन्मानित केले. संस्था विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य (Chinchwad) देते. त्यामुळे महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थी पालकांकडून प्रथम प्राधान्यक्रम दिला जातो.

संचालक मंडळ दर्जा उंचावण्यासाठी प्रयत्नशील –

पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, सचिव विठ्ठल काळभोर, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त आणि कुलपती हर्षवर्धन पाटील, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई हे शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील आहे असे पाटील म्हणाले.

31 हजारांहून अधिक विद्यार्थी नामांकित कंपन्या मध्ये कार्यरत –

उत्तम शिक्षणामुळे एकोणतीस हजारांहून अधिक विद्यार्थी नामांकित बहुराष्ट्रीय कंपन्यामध्ये चांगल्या पदांवर कार्यरत आहेत.

Total
0
Shares
Related Posts
Total
0
Share