PCMC School News: विद्यार्थ्यांना दहा दिवसांत गणवेश मिळणार

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या बालवाडी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचे गणवेश ठेकेदाराकडून प्राप्त झाले असून त्याचा दर्जा तपासण्यासाठी पालिकेने इचलकरंजी येथील एका संस्थेकडे गणवेश पाठविले आहेत. याचा अहवाल आल्यानंतर येत्या 10 दिवसात पालिका शाळेतील विद्यार्थ्यांना गणवेशाचे वाटप करण्यात येणार आहे. 

शहरातील महापालिकेच्या बालवाडी, प्राथमिक, माध्यमिक शाळा आहेत. या शाळांमध्ये 44 हजार पेक्षा जास्त विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. शाळा सुरू होऊन तीन महिन्यांपेक्षा जास्त कालावधी झाला तरी प्रशासकीय राजवटीत गोर-गरीब विद्यार्थी शालेय साहित्यापासून वंचित आहेत. न्यायालयाने दिलेल्या आदेशाप्रमाणे पूर्वीच्याच तीन ठेकेदाराकडून शालेय साहित्य पालिकेने घेतले आहे.

Stree shakticha jagar : शिक्षिकांनी स्त्री शक्तीचा जागर करीत विद्यार्थ्यांना दिले संस्कारांचे अमूल्य धडे

त्यानुसार श्री महालक्ष्मी ड्रेसेस या पुरवठादाराने 88 हजार 178 गणवेश, प्रेस्टिज गारमेंन्ट या पुरवठादाराने 88 हजार 178 पीटी गणवेशांचा पुरवठा तर वैष्णवी महिला कॉर्पोरेशन पुरवठादाराने 8 हजार 483 स्वेटरचा पुरवठा केला आहे. हे गणवेश फुगेवाडीतील शाळेत ठेवण्यात आले आहेत.

महापालिका व पुरवठादार यांच्यातील करारानुसार गणवेशाचा कापडाचा दर्जा तपासणीसाठी इंचलकरंजी येथील संस्थेकडे पाठविले आहेत. अद्याप त्यांचा तपासणी अहवाल प्राप्त झालेला नाही. अहवाल प्राप्त झाल्यानंतर तत्काळ गणवेश व स्वेटरचे वितरण केले जाईल, असे शिक्षण विभागाचे उपायुक्त संदीप खोत यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.