Nigdi : घरासमोर पार्क केलेली आलिशान ईनोवा कार चोरीला

एमपीसी न्यूज – घरासमोर पार्क केलेली इनोव्हा कार अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. हा प्रकार रविवारी (दि. 24) सकाळी सातच्या सुमारास निगडी प्राधिकरण येथे उघडकीस आला.

संतोष गणपत शिंदे (वय 49, रा. प्राधिकरण निगडी) यांनी याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी संतोष यांचा मुलगा समृद्ध याने त्यांची एम एच 14 / बी एक्स 3883 ही इनोवा कार शनिवारी सायंकाळी पावणेसातच्या सुमारास त्यांच्या घरासमोर सार्वजनिक रस्त्याच्या बाजूला पार्क केली. रात्री अज्ञात चोरट्यांनी चार लाख रुपये किंमतीची कार चोरून नेली. रविवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.