Bhor : 70 हजार रुपयांची लाच मागणाऱ्या भोर येथील उपअभियंत्याला अटक

एमपीसी न्यूज – पाणी पुरवठा योजनेचे पाईप खरेदीचे बिल (Bhor) मंजूर करण्यासाठी तब्बल 70 हजार रुपयांची लाच मागितल्या प्रकरणी लाचलुचपत विभागाने ग्रामीण पाणी पुरवठा उप विभाग भोरच्या उपअभियंत्याला मंगळवारी (दि.7) ताब्यात घेतले आहे.

जयंत सोपानराव ताकवले (उप अभियंता वर्ग 1) असे अटक आरोपीचे नाव आहे. ताकवले याने तक्रारदाराला ग्रामीण पाणी पुरवठा योजनेचे पाईप खरेदीचे बील मंजूर करण्यासाऑी 70 हजार रुपयांची लाच मागितली. ही रक्कम बिलाच्या दोन टक्के असे ठरली होती. तक्रार प्राप्त झाल्या नंतर मंगळवारी भोर येथील पंचायत समिती कार्यालय येथे सापळा रचून आरोपीला लाच घेत असताना रंगे हात अटक केली .

भोर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून लाचलुचपत (Bhor) विभागाचे पोलीस निरीक्षक भारत साळुंखे पुढील तपास करत आहेत.

CM Fellowship : मुख्यमंत्री फेलोशिपसाठी 2 मार्चपर्यंत अर्ज करावे – मुख्यमंत्री

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.