Pimpri : मादिगा समाजाला जातीच्या दाखल्यासाठी भेडसावणाऱ्या अटींसंदर्भात शासनाला अहवाल सादर

आमदार चाबुकस्वार यांच्या प्रयत्नांना क्रांतिकारी यश

एमपीसी न्यूज – अनुसूचित जातीमध्ये समावेश असूनही हातावर पोट असणाऱ्या मादिगा समाजाला १९५० च्या पुराव्याची अट शिथिल करण्याबरोबरच त्यांचे सामाजिक व शैक्षणिक पुनर्वसन करणारा सकारात्मक अहवाल आज राज्य शासनाला सादर करण्यात आला.

राजर्षी शाहू महाराज जयंती दिनाच्या निमित्ताने राज्याचे सामाजिक न्याय मंत्री डॉ. सुरेश खाडे यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) चे महासंचालक कैलास कणसे व आमदार ॲड. गौतम चाबुकस्वार यांनी हा अहवाल आज सादर केला. मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठाणच्या सभागृहात आयोजित या कार्यक्रमाला सामाजिक न्याय राज्यमंत्री अविनाश महातेकर, आमदार प्रा. जोगेंद्र कवाडे, प्रधान सचिव दिनेश वाघमारे, आयुक्त मिलिंद शंभरकर, आदी जांबूमनी सेवा समाजाचे पुणे जिल्हा अध्यक्ष मारूती अण्णा पंद्री आदी यावेळी उपस्थित होते.

सदर अहवाल आता मुख्यमंत्र्यांना सादर होऊन त्याचे अध्यादेशात रूपांतर झाल्यानंतर राज्यातील सुमारे ९ लाख मादिगा समाज बांधवांना याचा लाभ होणार आहे. अनुसूचित जातीमध्ये ५९ जात घटकांचा समावेश आहे. मादिगा ही जात देखील अनुसूचित जातीमध्ये मोडत असली तरी आर्थिक, शैक्षणिक व सामाजिक मागासलेपणामुळे ९५ टक्के नागरिकांना जातीचा दाखला, जात पडताळणी प्रमाणपत्र यासाठी अत्यावश्यक असलेला १९५० पूर्वीचा पुरावा शासनाला सादर करणे ही समस्या बनली होती.

चार वर्षापूर्वी पिंपरीचे आमदार ॲड. गौतम चाबुकस्वार यांनी मादिगा समाजाचे प्रश्न व त्यांच्या अडचणी लक्षात घेऊन मादिगा समाजाचा भव्य मेळावा पिंपरीत आयोजित करून तत्कालीन सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांना निमंत्रित केले होते. त्यावेळी मादिगा समाजाचे सर्व प्रश्न सोडविण्यासाठी बार्टीच्या नेतृत्वाखाली समिती स्थापन करून या समाजाच्या व्यथा व प्रश्न सोडविण्यासाठी अहवाल सादर करण्याचे आदेश बडोले यांनी दिले होते. अखेर हा अहवाल तयार होऊन राज्यशासनाला आज बार्टीने सामाजिक न्याय दिनाच्या निमित्ताने सादर केला.

यावेळी आदि जांबुमनी सेवा समाज संघाचे राज्यातील पिंपरी-चिंचवड – चंद्रकांत कानडी, शेखर भंडारी, दिंदाप्पा देवनोळ, साईनाथ तेलंग, कोंडीबा जेपूल, सोमनाथ तेलंगी, शेखर तलारे, रेवण पल्ले, सायबन्ना मुडमल, जवाहर इटकल, हनुमंता ढोल, नरसप्पा शेट्टी, विष्णू ढोल, श्रीनिवास म्हेत्रे, नलेश रेड्डी, सिद्राम बागलेर, हनुमंता पल्ले. देहूरोड – शशीकांत सपागुरू, प्रकाश मसे, रमेश म्हेत्रे, सुरेश कटामणी. सोलापूर – माजी महापौर संजय हेमगड्डी, दवेंद्र भंडारी, माजी नगरसेविका सौ. नरसुबाई गदवालकर, हनुमंता जंगम, बसवराज म्हेत्रे, व्यंकटेश भंडारे. धारावी – स्वामी हरिवंशनंद महाराज, करयाप्पा तलारे, सुरेश मोगला, निरंजन नंदपल्लीकर. अंबरनाथ – महादेव शावणे, रंगप्पा मादर, भगवान अप्पा. आनंदनगर शाखेचे – हनुमंता पल्ले, मारूती कानडी, विशाल देवनोळ, शंकर ढोल, हनुमंता तेलगु, दुर्गेश इटकल उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.