Chinchwad : ‘प्रतिभा’च्या विद्यार्थ्यांचे क्रीडा स्पर्धांमध्ये यश

एमपीसी  न्यूज – चिंचवड येथील कमला शिक्षण संस्था संचलित प्रतिभा इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंटमध्ये एम. बी. ए. च्या दुसऱ्या वर्षात शिक्षण घेत असलेला विद्यार्थी शौनक सपकाळ याने शरीर सौष्ठव स्पर्धेत सुवर्ण पदक पटकाविले.

_MPC_DIR_MPU_II

विशाखापट्टणम येथे आदिवासी समाजातील पहिली राष्ट्रीय हिल व्हॅलीज आणि माऊटन्स (एच.व्ही.एम.) शरीर सौष्ठव स्पर्धा झाली. त्यात 171 से. मी. व त्यापुढील उंचीच्या खुल्या गटात मेन फिजीक स्पर्धेत सुवर्ण पदक व विविध गटाच्या एकूण सहभाग घेतलेल्या राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत शौनकने चौथा क्रमांक पटकाविला. बी.बी.ए. शाखेतील टी. वाय.मध्ये शिक्षण घेत असलेला धावपटू संदीप बहोत याने राज्य स्तरावरील विविध ठिकाणी झालेल्या 100 मीटर धावणे, 6, 10 व 21 किलोमीटर धावणे स्पर्धेत सिल्व्हर व ब्रांझ पदके पटकावली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.