Mulshi: रोज 60 किमी प्रवास करुन घेतले शिक्षण, दहावीत मिळवले 94.60 टक्के

success story of rajendra margale who passed 10th exam In adverse conditions राजेंद्र शिक्षणासाठी 60 किमी लांबीचा लोणावळा ते नांदगाव असा एसटीने प्रवास करायचा. त्यांचे वडील माळीकाम करतात.

0

एमपीसी न्यूज – प्रतिकूल परिस्थितीवर मात करून मुळशी तालुक्यातील नांदगावच्या राजेंद्र मरगळे या विद्यार्थ्याने दहावीत 94.60 टक्के गुण मिळविले आहेत. राजेंद्र शिक्षणासाठी 60 किमी लांबीचा लोणावळा ते नांदगाव असा एसटीने प्रवास करायचा. त्यांचे वडील माळीकाम करतात.

दहावीच्या परीक्षेत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत राजेंद्र मिळवलेल्या घवघवीत यशा निमित्त युवा सेनेकडून त्याचे अभिनंदन करण्यात आले. यावेळी भारतीय विद्यार्थी सेना संघटक नितीन देशमुख, करंडोली शिवसेना शाखाप्रमुख खंडूभाऊ शेलार, देवघर शिवसेना शाखाप्रमुख काशिनाथ देशमुख उपस्थित होते.

राजेंद्रला विज्ञान शाखेतून शिक्षण पूर्ण करायचे आहे. त्याच्या पुढील शिक्षणासाठी लागणारी मदत युवा सेनेच्या वतीने करण्यात येईल, असे युवा सेना मावळ विधानसभा चिटणीस विशाल हुलावळे यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like