Pimpri News : वीर सह्याद्री ट्रेकर्सच्या मावळ्यांची वजीर सुळक्यावर यशस्वी चढाई  

एमपीसी न्यूज – छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून वीर सह्याद्री ट्रेकर्सच्या मावळ्यांनी पॉइंट ब्रेक एडवेंचरच्या टीमसोबत आव्हानात्मक असा वजीर सुळका यशस्वीपणे सर केला. या टीममध्ये बारा आणि तेरा वर्षांच्या मुलांचाही सहभाग होता.

देहूगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे मुख्य वैद्यकीय अधिकारी, नेत्रतज्ज्ञ डॉ. किशोर यादव, युवा उद्योजक संदिप येळवंडे, कालिदास गाडे, सागर काळडोके, नचिकेत गाडे, राहुल भालेकर, विशाल गोपाळे, मारूती विधाटे, विजय पाटील, विजय गायकवाड, अथर्व जयराम यादव (वय-13), विक्रांत पाटील (वय 12),  आदींनी वजीर सुळका सर केला. विशेष म्हणजे या टीममध्ये डॉ. किशोर यादव आणि त्यांचा पुतण्या अथर्व यादव तर  विजय पाटील आणि विक्रांत पाटील असे बाप लेक सहभागी झाले होते.

वजीर सुळक्याचे फक्त नाव घेतले तरी भल्या भल्यांना घाम फुटतो. प्रत्येक टेकरचे स्वप्न असणारा छातीत धडकी भरवणारा अजस्त्र, अफाट असा वजीर सुळका 280 फुट ऊंचीचा आहे. ठाणे जिल्ह्यातील शाहपूर तालुक्यातील वासिंद रेल्वे स्थानकाजवळ वांद्रे नावाचे गाव आहे. त्या गावातून माहुली किल्ला आणि त्याच्या दक्षिणेकडील टोकाला मागे मुख्य डोंगर रांगेपासून सुटलेला हा कडा म्हणजे वजीर सुळका आहे.  वजीर सुळका हा ट्रेकर व दुर्गप्रेमींमध्ये मोठया प्रमाणात कुतूहल आहे. वैशिष्टयपूर्ण आकारामुळे एखाद्या बुद्धिबळाच्या सारिपटलावर जसा वजीर सोंगटी उभी असतो तसा हा सुळका उभा आहे.

या मोहिमेबाबत देहूगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे मुख्य वैद्यकीय अधिकारी, नेत्रतज्ञ, ट्रेकर डॉ. किशोर यादव म्हणाले, वजीर सुळक्यावर यशस्वी चढाई करणे प्रत्येक निर्यारोहकाचे, दुर्गप्रेमींचे स्वप्न असते. सह्याद्रीच्या डोंगर रांगात भटकंती करत असताना वजीर सुळका नेहमीच खुणावत होता. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून वीर सह्याद्री ट्रेकर्सच्या टीमने पॉइंट ब्रेक एडवेंचरच्या टीमसोबत आव्हानात्मक असा वजीर सुळका यशस्वीपणे सर केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.