Pimpri : पालिकेच्या अधिकाऱ्यांची एव्हरेस्ट बेस कॅम्पवर यशस्वी चढाई

एमपीसी न्यूज – पावसामुळे चिखलमय झालेल्या मार्गातून वाट काढत पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या 22 जणांच्या टीमने 11 दिवसांची पायपीट करत एव्हरेस्ट बेस कॅम्पवर यशस्वी चढाई केली. पिंपरी (Pimpri) -चिंचवड महापालिकेचा फलक झळकाविला.
या मोहिमेत सुरेंद्र शेळके व बालाजी माने यांच्या मार्गदर्शनाखाली भांडार विभागाचे उपायुक्त मनोज लोणकर, माजी नगरसेवक राजेंद्र गावडे, सहशहर अभियंता मनोज सेठिया, पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता रामनाथ टकले, विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता नितीन देशमुख, दिलीप धुमाळ, माणिक चव्हाण, उप अभियंता सुनील पवार,
Pune : विश्वगुरुत्व वैभवात नाही तर विचारात : ह. भ. प. प्रकाश महाराज बोधले
(Pimpri) प्रकाश कातोरे, दिलीप भोसले, माहिती व तंत्रज्ञान अधिकारी विजय बोरुडे, लेखाधिकारी आनंद गायकवाड, मुख्य लिपिक अनिल खामकर, योगेश्वरी लोणकर, प्रशांत कोंडे, संजय बागडे, देवीदास वंजारी, स्वाती वंजारी, स्नेहल घेरडे, संदिप कौशिक यांनी या मोहिमेत भाग घेतला.
पिंपरी(Pimpri)-चिंचवड महापालिका व पिंपरी-चिंचवड माऊंटेनिअनिंग असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने एव्हरेस्ट बेस कॅम्प सर करण्यासाठी विशेष मोहिमेचे आयोजन केले होते.
या मोहिमेत पालिकेतील विविध विभागाचे अधिकारी व माजी नगरसेवक अशा 22 जणांचा चमूने फाफलू नेपाळ उंची 7700 फूट वरून ट्रेकला दि. 6 मे 2023 ला सुरुवात केली.
मजल दरमजल करत दि. 16 मे दुपारी 3.30 वाजता 17 हजार 600 फूट उंची असलेल्या एव्हरेस्ट बेस कॅम्पवर यशस्वी चढाई करत मोहीम फत्ते केली. एकूण 11 दिवसांत 160 किमी पायी चालत ही मोहीम यशस्वी केली.