मंगळवार, डिसेंबर 6, 2022

Infertility Treatment: वंध्यत्व उपचारानंतरची पहिली प्रसूती यशस्वी

 एमपीसी न्यूज –  ‘डी पी यु – आय व्ही एफ व इंडोस्कोपी सेंटर, डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालय, पिंपरी, पुणे येथील केंद्रामध्ये एक आव्हानात्मक प्रसूतीव्दारे वंध्यत्व उपचाराला मिळाले यश तज्ज्ञ डॉक्टरांना मिळाले आत्मविश्वासाचे बळ.’

संबंधित महिला गेल्या चार वर्षांपासून मातृत्व प्राप्तीसाठी उपचार घेत होती. पण, यश काही मिळाले नाही. निराश मानसिकतेत त्या डी पी यु – आय व्ही एफ सेंटरमध्ये आल्या, त्यांची शारीरिक, मानसिक व आरोग्य स्थिती सुधारणे हे फार मोठे आव्हान डॉक्टरांपुढे होते.  तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वंध्यत्व उपचारांला त्यांची सकारात्मक साथ मिळाली आणि सुप्रसिद्ध वंध्यत्वरोग तज्ज्ञ डॉ.सुनीता तांदूळवाडकर यांच्या नेतृत्वाखाली उपचार पूर्ण झाले.

Eknath Shinde : एकनाथ शिंदे नॉट रिचेबल; राज्याच्या राजकारणात भूकंपाची शक्यता

या केंद्रातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून काही दिवसांतच गर्भधारणापुर्ण झाली. ती संपूर्ण नऊ महिने तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली होती. नुकतेच एका गोंडस बाळाला तिने जन्म दिला. परिवारातील आनंदाचा क्षण सर्वांनीच अनुभवला. या केंद्रामधील ही एक आव्हानात्मक व अभिमानास्पद कामगिरी असल्याचे डॉ. सुनीता तांदुळवाडकर यांनी सांगितले, त्यापुढे म्हणाल्या, प्रगत तंत्रज्ञान व प्रदीर्घ अनुभव यांच्या साथीने कृत्रिम गर्भधारणेतून गरजू जोडप्यांना पालकत्वाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत.

या यशामध्ये डॉ. सुनीता तांदुळवाडकर, डॉ. राजेंद्र शितोळे, डॉ. बुशरा खान, डॉ.मधुकर शिंदे,  पवन कुलकर्णी, डिंपल देसाई,

डॉ. शीतल तापकिरे यांचा मोलाचा सहभाग होता.

Latest news
Related news