Lonavala : भोंडे हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी बनविलेल्या सॅटेलाईटचे यशस्वी उड्डाण

(भोंडे हायस्कूल व इस्त्रोचा उपक्रम)

एमपीसी न्यूज – येथील अॅड. बापूसाहेब भोंडे हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी बनविलेल्या चार सॅटेलाईट संचांचे ड्रोनच्या सहाय्याने यशस्वी उड्डाण करण्यात आले. इस्त्रोच्या शास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनाखाली हे सॅटेलाईट संच बनविण्यात आले होते.

इस्रोचे माजी समुह संचालक व इंटरनॅशनल स्पेस सोसायटीचे अध्यक्ष  सुरेश नाईक व पुणेकर एज्युकेशन इनिशिएटिव्हजचे अध्यक्ष सुहास पुणेकर यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या कॅनसॅट मिशन २०१८ या दोन दिवसाच्या प्रशिक्षण शिबिरात भोंडे हायस्कूलच्या 20 विद्यार्थ्यांना सॅटेलाईट बनवण्याचे प्रशिक्षण देण्यात आले.

दोन दिवसाच्या प्रशिक्षण शिबिरात विद्यार्थ्यांना डाॅ.प्रफुल्ल, राघव, सौरभ या शास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनाखाली लिखित व कृतीयुक्त शिक्षण देण्यात आले. पाच विद्यार्थ्यांचा एक समुह याप्रमाणे चार ग्रुप द्वारे चार उपग्रह (सॅटेलाईट) तयार करण्यात आले, नंतर त्यांचे ड्रोनच्या साहाय्याने यशस्वी उड्डाण करण्यात आले. यामध्ये मुलांनी स्वत: उपग्रह बनवून त्यांच्या कडून प्राप्त झालेला डेटा ग्राउंड स्टेशनवर संकलीत केला .अॅड बापूसाहेब भोंडे हायस्कूल ही मावळातील पहिलीच शाळा अाहे की जेथे विद्यार्थ्यांकडून अशाप्रकारचे उपग्रह बनवून त्यांचे यशस्वी उड्डाण करण्यात अाले  या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी शास्त्रज्ञ सुरेश नाईक यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. लोणावळ्याच्या नगराध्यक्षा सुरेखा जाधव, सुहास पुणेकर, मुख्याधिकारी सचिन पवार अॅड.माधवराव भोंडे मुख्याध्यापिका प्रगती साळवेकर हे यावेळी उपस्थित होते.

विद्यार्थ्यांना अंतराळ विज्ञान व सॅटेलाईटचे ज्ञान

रिअल स्पेस मिशनच्या वातावरणाचे अनुकरण करुन अंतराळ विज्ञान, सॅटेलाईटस, इलेक्ट्राॅनिक्स आणि एम्बेडेड सिस्टम्स या विषयांचे विद्यार्थ्यांना मुलभुत ज्ञान पुरविणे हे या कार्यशाळेचे उद्दिष्ट असल्याचे सुरेश नाईक यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.