Pimpri News: महर्षी अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने विविध सामाजिक उपक्रमांचे यशस्वी आयोजन

एमपीसी न्यूज : महर्षी अध्यात्म विश्वविद्यालय ही एक अध्यात्मिक संस्था असून विविध विषयांवर संशोधनाचे कार्य करते तसेच सामाजिक जाणीव जोपासली जावी याकरीता संस्थेच्या वतीने विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन केले जाते.यामध्ये प्रथमोपचार शिबीर,शालेय विद्यार्थ्यांना वही वाटप,आरोग्य तपासणी इत्यादी उपक्रम नियमित घेतले जातात.

या संस्थेच्या वतीने पिंपरी चिंचवड शहरात 25 ते 28 नोव्हेंबर या कालावधीत विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये थेरगाव येथील तुळजाभवानी महिला बचत गटाच्या सभासद गृहिणींसाठी प्रथमोपचार शिबिर घेण्यात आले.

यावेळी अचानक उद्भवलेल्या आपत्कालीन परिस्थितीत,किंवा छोट्या मोठ्या अपघाताच्या वेळी डॉक्टरी मदत मिळण्यापूर्वी प्रथमोपचार म्हणून कोणत्या कृती करणे आवश्यक आहे याविषयी माहिती देण्यात आली.

FIFA World Cup 2022: आजपासून रंगणार फिफा वर्ल्ड कप नॉकआउट्सचे सामने

तसेच चिंचवड येथील श्रीमती कोंडाबाई गोलांडे प्राथमिक विद्यालयातील इयत्ता पाचवी ते सातवी च्या विद्यार्थ्यांसाठी योग शिबीर घेण्यात आले.योग शिक्षक श्री दिलीप पाटील यांनी नियमित योगासने करण्याचे फायदे मुलांना सांगितले आणि प्रात्यक्षिके करून दाखविली.

हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ स्वाती जोशी तसेच सहशिक्षिका सौ विद्या नायडू व सौ उज्वला चौधरी यांनी मोलाचे सहकार्य केले.

मोरवाडी (पिंपरी) येथील श्री रेणुकादेवी प्राथमिक विद्यामंदिर या शाळेतील इयत्ता पहिली ते इयत्ता चौथी मधील सर्व विद्यार्थ्यांना संस्कार वह्यांचे वाटप करण्यात आले. वही वाटप उपक्रमासाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री रमेश तिखे, सहशिक्षक श्री सुखदेव आंबले, सौ स्वाती शिर्के व सौ मीनाक्षी आगळे यांनी सहकार्य केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.