Lonavala : लायन्स पाॅईंटच्या दरीतून युवतीचा मृतदेह बाहेर काढण्यात यश

एमपीसी न्यूज – लायन्स पाॅईंटच्या दरीतून हैदाबाद येथील युवतीचा मृतदेह बाहेर काढण्यात शिवदुर्गच्या पथकाला यश आले. दोन दिवस ही शोध मोहिम सुरु होती.

हैदाबाद येथील युवती अलिझा राणा (वय 24) ही कामानिमित्त पुण्यात आली होती. या युवतीची बॅग लोणावळ्याजवळील लायन्स पाॅईंट दरीच्या ठिकाणी मिळून आल्याने तिने याठिकाणी येऊन आत्महत्या केल्याच्या संशयावरुन दोन दिवस दरीत शोध मोहीम राबविण्यात आली. मात्र, काहीच माहिती हाती लागत नव्हती.

_MPC_DIR_MPU_II

शिवदुर्ग मित्र या रेस्कू पथकातील आनंद गावडे, चंद्रकांत गाडे, राजेंद्र कडु, वैष्णवी भांगरे, विकास मावकर, दुर्वेश साठे, राहुल देशमुख, प्रविण ढोकळे, सनी कडु, निकेत तेलंगे, अशोक उंबरे, महेश मसने, अभी बोरकर, अनिल आंद्रे, शुभम आंद्रे, अंकुश महाडीक, प्रणय अंबुरे, वैभव शेलार, अजय शेलार, प्रविण देशमुख, ओंकार पडवळ, कपिल दळवी,योगेश अंभोरे, अमोल परचंड, चंद्रकांत बोंबले, अनिकेत आंबेकर, प्रिन्स बैठा, हर्ष तोंडे  रोहित वर्तक, समीर जोशी, सुनील गायकवाड यांनी आज तिसर्‍या दिवशी पुन्हा दरीत उतरुन शोध घेतला असता अलिझा राणा हिचा मृतदेह मिळून आला. अलिझा हिचा हा अपघात आहे की आत्महत्या याचा तपास लोणावळा ग्रामीण पोलीस घेत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.