Pimpri News : सोहन वाचन कट्ट्याची यशस्वीपणे तीन वर्षे पूर्ण  

एमपीसी न्यूज – मराठी साहित्याचे लहान-मोठे सर्वांकडून जास्तीत जास्त वाचन-लेखन व्हावे या उद्देशाने 15 ऑक्टोबर 2018 रोजी स्थापन केलेल्या सोहन वाचन कट्ट्याला यशस्वीपणे तीन वर्षे पूर्ण झाले. कट्ट्याला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. या कट्ट्यामध्ये पिंपरी-चिंचवड, महाराष्ट्राच्या बाहेर अगदी भारताच्या बाहेर सुद्धा साहित्य रसिक जोडले गेलेत.

माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचे प्रगत भारताचे स्वप्न साकारण्यासाठी त्यांचा जन्मदिन 15 ऑक्टोबर हा वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा केला जातो. यानिमित्ताने वाचनाचे महत्व समजावे, वाचनाची आवड निर्माण व्हावी, मुलांमध्ये वाचनाची गोडी निर्माण व्हावी यासाठी अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. यागोष्टी समोर ठेवून आणि मराठी साहित्याचे लहान-मोठे सर्वांकडून जास्तीत-जास्त वाचन-लेखन व्हावे. या उद्दिष्टाने तीन वर्षापूर्वी म्हणजेच 15 ऑक्टोबर 2018 रोजी सोहन वाचन कट्ट्याची स्थापना झाली.

प्रणाली मंगेश महाशब्दे यांनी घरातून सुरू केलेला हा उपक्रम लॉकडाऊनच्या काळातही सातत्याने सुरू आहे. आज या कट्ट्यामध्ये पिंपरी-चिंचवडच्या बाहेर महाराष्ट्राच्या बाहेर अगदी भारताच्या बाहेर सुद्धा साहित्य रसिक जोडले गेले आहेत. मुलांसाठी आणि मोठ्यांसाठी वेगवेगळे विषय, वेगवेगळे उपक्रम घेऊन हा वाचन कट्टा कार्यरत आहे.

वाचन कट्ट्याबद्दल संचालिका प्रणाली महाशब्दे यांनी सांगितले की, हा वाचन कट्टा विनाशुल्क पण बहुमूल्य अशा विचारांवर सुरू आहे. महिन्यातील प्रत्येक मंगळवारी हा वाचन कट्ट्या चालतो. ब-याच वेळेस वेगवेगळ्या विषयातील तज्ञ, मान्यवर व्यक्ती पण कट्ट्यावर येऊन गप्पा मारत असतात. सोहन वाचन कट्ट्याने मागील वर्षीपासून मोठ्यांचा आणि लहानांचा वेगवेगळा असा दिवाळी अंक, मराठी नवीन वर्षाचा विशेष अंक प्रकाशित केलेला आहे. ज्यामध्ये अनेक मान्यवरांचे लेख वाचावयास मिळाले. तर, अशा या सोहन वाचन कट्ट्यामध्ये सर्वांनी नक्की सहभागी व्हावे.

सोहन वाचन कट्ट्यामध्ये सहभागी होण्यासाठी प्रणाली मंगेश महाशब्दे (9730020494)
https://chat.whatsapp.com/JrufBLxEFpkJ8iVpfCpnhX या लिंकने गटामध्ये सहभागी होता येईल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.