Mulshi : इंडस इंटरनॅशनल स्कूलच्या होस्टेलमध्ये अकरावीच्या विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या

एमपीसी न्यूज – मुळशी येथील इंडस इंटरनॅशनल स्कूलच्या मुलांच्या वसतिगृहात एका अकरावीच्या विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना 31 ऑगस्टच्या रात्री 11 ते 1 सप्टेंबर सकाळी आठ या कालावधीत घडली.

निश्चय गर्ग (वय 17, रा. सिनिअर बॉईज होस्टेल, इंडस इंटरनॅशनल स्कूल, आंग्रेवाडी, भूकूम ता. मुळशी, जि. पुणे, मूळ रा. चंदीगड), असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे.

निश्चय हा मुळशीतील आंग्रेवाडी येथील इंडस इंटरनॅशनल स्कूलमध्ये अकरावीच्या वर्गात शिकत होता. तो मुळचा चंदीगडचा असून शाळेतील वरिष्ठ मुलांच्या वसतीगृहात राहत होता. दरम्यान शुक्रवारी रात्री त्याने राहत्या रूमच्या खिडकीला इलेक्ट्रीक वायरने गळफास घेऊन आत्महत्या केली.

दरम्यान, पौड पौलिसांनी घटनास्थळाची तपासणी करून ससून रुग्णालयात निश्चयचे शवविच्छेदन करून मृतदेह त्याच्या नातेवाईकांच्या ताब्यात दिला आहे. प्राथमिक तपासात आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलीस अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.