pune : भाजप आमदारावर गुन्हा दाखल करणाऱ्या ‘त्या’ पोलीस निरीक्षकाची बदली

एमपीसी न्यूज : भारतीय जनता पक्षाचे आमदार योगेश टिळेकर यांच्यावर ५० लाख रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल केलेल्या पोलिस निरीक्षकाची अचानक बदली करण्यात आली आहे. कोंढवा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक मिलिंद गायकवाड यांची बदली झाली आहे. मात्र आता सत्ताधारी पक्षाच्या आमदारावर गुन्हा दाखल केल्याने गृह मंत्रालयातून सूत्रे हलवून गायकवाड यांची बदली करवण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे.

गायकवाड यांची विशेष शाखेत बदली करण्यात आली आहे. टिळेकर यांनी ५० लाख रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी कोंढवा परिसरातील केबल व्यावसायिकाने तक्रार दिली होती. त्यावरून टिळेकर यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. दरम्यान, याबाबत गायकवाड यांच्याशी संपर्क संपर्क होऊ शकला नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.