Hinjawadi : हाताची नस कापून पोलीस ठाण्यासमोर आत्महत्येचा प्रयत्न

एमपीसी न्यूज – हाताची नस कापून एका इसमाने पोलीस ठाण्यासमोर आत्महत्येचा प्रयत्न केला. ही घटना आज (गुरुवारी) दुपारी पावणेसहाच्या सुमारास हिंजवडी पोलीस ठाण्यासमोर घडली. हिंजवडी पोलिसांनी मात्र असे काहीही झाले नसल्याचे सांगितले.

मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी दुपारी पावणेसहाच्या सुमारास एका इसमाने हाताची नस कापून हिंजवडी पोलीस ठाण्यासमोर आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. जखमीला तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या व्यक्तीचे नाव व कारण समजू शकले नाही.

दरम्यान, हिंजवडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यशवंत गवारी यांनी असा काहीही प्रकार नसल्याचे सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.