BNR-HDR-TOP-Mobile

Wakad : विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या

0

एमपीसी न्यूज – एका विवाहितेने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना गुरूवारी (दि. १०) दुपारी वाकड येथे घडली.

सपना गणेश काळे (वय २१, रा. म्हातोबा नगर, वाकड), असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे.

सहाय्यक निरीक्षक सपना देवतळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरूवारी दुपारी साडेचार वाजताच्या सुमारास सपना यांनी राहत्या घरात साडीच्या सहाय्याने छताच्या पंख्याला गळफास घेतला. त्यांना रुग्णालयात दाखल केले असता उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. वाकड पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.

HB_POST_END_FTR-A2

HB_POST_END_FTR-A3