Pimpri : कचरा वेचक महिलेची गळफास घेऊन आत्महत्या

एमपीसी न्यूज – कचरा वेचक महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना आज, मंगळवारी (दि. 10) सकाळी पिंपरी मधील रमाबाई नगर येथे उघडकीस आली आहे.

संगीता बाळू गाडे (वय 40, रा. रमाबाई नगर, पिंपरी) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत संगीता पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आरोग्य विभागात कंत्राटी पद्धतीवर काम करत होत्या. त्यांनी राहत्या घरी खांबाला साडीच्या साहाय्याने गळफास घेतला. ही घटना सकाळी उघडकीस आली. संगीता यांच्या मुलाने त्यांना तात्काळ उपचारासाठी पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.