Chinchwad : नवविवाहित तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या

एमपीसी न्यूज – नवविवाहित तरुणीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना आज (गुरुवारी) सकाळी चिंचवड मधील इंदिरानगर दळवीनगर येथे घडली.

कावेरी किसन गायकवाड (वय 19, रा. इंदिरानगर, दळवीनगर, चिंचवड) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत कावेरीचा किसन गायकवाड याच्यासोबत मागील सहा महिन्यांपूर्वी विवाह झाला. कावेरी त्यांच्या पतीसोबत चिंचवड येथे राहत होत्या. आज सकाळी कावेरी यांनी त्यांच्या तळेगाव येथे राहणाऱ्या भावाला फोन केला. फोनवर त्यांनी आत्महत्या करत असल्याचे सांगितले. त्यावेळी त्यांचा पती पुणे येथे गेला होता. तळेगाव येथून भाऊ येईपर्यंत कावेरी यांनी छताच्या पंख्याच्या हुकाला नायलॉन दोरीच्या साहाय्याने गळफास घेतला. यानंतर हा प्रकार उघडकीस आला. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.