Kasarwadi : मद्यधुंद अवस्थेत महिलेची गळफास घेऊन आत्महत्या

एमपीसी न्यूज – पती-पत्नी एकत्रित मद्यप्राशन केले. त्यानंतर त्यांचे भांडण झाले. या भांडणाच्या रागातून पत्नीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शनिवारी (दि. 18) पहाटे शास्त्रीनगर कासारवाडी येथे घडली.

सिंधू नामदेव शिंदे (वय 34, रा. शास्त्री नगर, कासारवाडी) आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सिंधू आणि नामदेव हे पती-पत्नी शास्त्रीनगरमधील सुखवानी पॅराडाईज येथे राहतात. त्यांनी शुक्रवारी एकत्रित जेवण केले. दरम्यान दोघांनी मद्यप्राशन केले. जेवणानंतर त्यांच्यामध्ये भांडण झाले. भांडणानंतर दोघेही वेगवेगळ्या खोल्यांमध्ये झोपले. भांडणाच्या रागातून सिंधू यांनी फॅनला साडीच्या साहाय्याने गळफास घेतला. शनिवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला. नामदेव यांनी त्यांना तात्काळ पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण स्मृती वायसीएम रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.