Dehuroad : तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या

एमपीसी न्यूज – तरुणीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी (दि. 9) रोजी रात्री नऊच्या सुमारास देहूरोड मधील विकासनगर येथे घडली.

तृप्ती ढिल्लोड (वय 19, रा. विकासनगर, देहूरोड) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तृप्तीला मागील तीन दिवसांपूर्वी हिंजवडी येथील एका कॉल सेंटर मध्ये नोकरी मिळाली होती. मागील तीन दिवसांपासून ती नियमितपणे नोकरीस जात होती. सर्व काही व्यवस्थित असताना मंगळवारी सायंकाळी ती ऑफिसमधून घरी आली. त्यानंतर तिने घरामध्ये स्वतःला गळफास लावून आत्महत्या केली. घरचे तिला जेवणासाठी बोलवायला गेले असता तृप्ती गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली. तिला तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तिचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. तृप्तीच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही. देहूरोड पोलीस ठाण्याचे हेड कॉन्स्टेबल शाम शिंदे तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.