Pune: पुण्यातील आत्महत्येचे सत्र थांबेना; दिवसभरात महाविद्यालयीन तरुण आणि बिल्डरची आत्महत्या

Suicide cases increased in Pune amid coronavirus pandemic. पुण्यातील आत्महत्येचे सत्र थांबेना.

एमपीसी न्यूज – मागील काही दिवसांपासून पुणे शहरात सुरू असलेले आत्महत्येचे सत्र काही थांबताना दिसत नाहीये. कारण मागील 24 तासात दोघांनी आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. यामध्ये 20 वर्ष तरुण आणि 50 वर्षीय बांधकाम व्यावसायिक यांचा समावेश आहे. कोथरूड आणि नऱ्हे परिसरात या घटना घडल्या आहेत.

कोथरूड परिसरातील घटनेत रामचंद्र लक्ष्मणराव बबलतकर (वय 55) या बांधकाम व्यावसायिकाने इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. ही घटना आज दुपारी दोनच्या सुमारास घडली.

याप्रकरणी कोथरूड पोलीस ठाण्यामध्ये घटनेची नोंद करण्यात आली. मयत रामचंद्र लक्ष्मणराव बबलतकर यांना बीपीचा त्रास आहे मागील दोन वर्षांपासून ते आजारी होते या तणावातून त्यांनी आत्महत्या केली असण्याची शक्यता आहे.

दुसऱ्या एका घटनेत नऱ्हे परिसरातील यश शिवाजी खोपडे या वीस वर्षे तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार आज सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास उघडकीस आला.

यश हा पदवीचे शिक्षण घेत होता तीन दिवसांपूर्वीच त्याने तीन मित्रासह नऱ्हे गावात भाड्याने फ्लॅट घेतला होता. बुधवारी रात्री त्याने मित्रांकडून चावी घेतली आणि तो राहण्यासाठी आला होता. आज सकाळी तो गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला.

सिंहगड पोलिस स्टेशनमध्ये घटनेची नोंद केली असून अधिक तपास सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.