Wakad : व्यवसायातील चढ-उतार आणि शारीरिक व्याधीला कंटाळून तरुणाची आत्महत्या

एमपीसी न्यूज – व्यवसायात येणारे चढ-उतार आणि शारीरिक व्याधी सहन न झाल्याने एका व्यावसायिक तरुणाने सोसायटीच्या बाराव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली.
ही घटना आज (मंगळवारी) सकाळी अकराच्या सुमारास वाकड येथे घडली.

आत्महत्या करण्यापूर्वी त्याने चिठ्ठी लिहून ठेवली असून ,त्यामध्ये ‘माझ्यामुळे तुम्हाला खूप त्रास होतोय. मी तुमच्या गरजा पूर्ण करू शकलो नाही. तुम्ही टेंशन घेऊ नका. मला माफ करा.’ आणि माझी ही सुसाईड नोट माझ्या पालकांना दाखवा’ असा मजकूर लिहिला आहे.
कुशाग्र मनोज कंचन (वय 30, रा. फ्लॅट नं एफ 1203, डायनेस्टी सोसायटी, वाकड, मूळ रा. झांशी) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.
पोलीस उपनिरीक्षक हरीश माने यांनी दिलेल्या माहितीनुसार, कुशाग्र मूळचा झाँशी येथील आहे. व्यवसायानिमित्त तो पिंपरी-चिंचवड शहरात राहतो. वाकड येथील डायनेस्टी सोसायटीत तो मित्रांसोबत राहत होता. इलेक्ट्रॉनिक पार्टस पुरविण्याचा त्याचा व्यवसाय होता. या व्यवसायामध्ये त्याला अनेकवेळा चढ-उताराला तोंड द्यावे लागले. त्यामुळे तो सतत तणावात होता. तसेच त्याला शारीरिक देखील आजार होता. त्यामुळेही तो तणावाखाली वावरत होता. या दोन्ही गोष्टींच्या नैराश्यातून त्याने चिठ्ठी लिहून बाराव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.