Pimpri : रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषदेच्या पिंपरी-चिंचवड शहराध्यक्षपदी सुजित कांबळे

एमपीसी  न्यूज – गणेशनगर थेरगाव येथील सामाजिक कार्यकर्ते सुजित सूर्यभान कांबळे यांची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रभर कार्यरत असलेल्या रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परीषदेच्या पिंपरी-चिंचवड शहराध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात आली. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर कांबळे यांनी त्यांना निवडीचे पत्र दिले.

ही परिषद सर्व जाती धर्मातील विद्यार्थ्यांच्या विविध समस्या, मागण्या व त्यांच्या कल्याणार्थ कार्य करते सर्व धर्मीय विद्यार्थ्यांना एकत्र घेऊन त्यांच्या उत्थानासाठी प्रयत्न करणार असल्याचे कांबळे यांनी यावेळी सांगितले. यावेळी आरपीआयचे शहराध्यक्ष सुधाकर वारभुवन, विनोद चांदमरे, बाबा सरवदे, लक्ष्मण गायकवाड, कुणाल वाव्हळकर, अविनाश शिरसाठ, भैय्या मानकर आदी मान्यवर उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.