Summer Vacation : राज्यातील शाळांना एक मे पासून उन्हाळी सुट्टी जाहीर

नवीन शैक्षिणक वर्ष 14 जून पासून सुरू होणार

एमपीसी न्यूज – राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांना एक मे पासून सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. 1 ते 13 जून असा हा सुट्टीचा कालावधी असणार आहे. नवीन शैक्षणिक वर्ष 14 जून पासून सुरू होणार आहे.

राज्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळातून उन्हाळ्याची व दिवाळीची सुट्टी याबाबत सुसूत्रता रहावी म्हणून शिक्षण संचालनालयामार्फत दरवर्षी शैक्षणिक वर्षातील सुट्यांची निश्चिती करण्यात येते. त्यानुसार सुट्याबाबत खालील सूचना आपण जिल्ह्यातील सर्व मान्यताप्राप्त शासकीय, अशासकीय प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालये व सैनिक शाळा यांना द्याव्यात, असे शिक्षण संचालक, माध्यमिक व उच्च माध्यमिक यांनी कळवले आहे.

यानुसार 1 मे ते 13 जून 2021 पर्यंत उन्हाळी सुट्टीचा कालावधी असणार आहे. तसेच, पुढील शैक्षणिक वर्ष सोमवार 14 जून 2021 रोजी शाळा सुरू होणार आहेत तर, विदर्भातील तापमान विचारात घेता सोमवार 28 जून 2021 रोजी शाळा सुरू होतील, असे सांगण्यात आलं आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.