Sundar Pichai : माझ्या विमान प्रवासासाठी वडिलांचा संपूर्ण वर्षाचा पगार खर्च व्हायचा – सुंदर पिचाई

My father used to spend a year's salary for my air travel - Sundar Pichai

एमपीसी न्यूज – अमेरिकेतील स्टॅंडफोर्ड विद्यापीठात शिकायला येण्यासाठी माझ्या विमान प्रवासावर वडिलांचा संपूर्ण वर्षाचा पगार खर्च व्हायचा, असे गूगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई यांनी आयुष्यात येणाऱ्या अडचणी बद्दल बोलताना आपला अनुभव सांगितला आहे.

पिचाई यांनी 2020 यूट्यूबच्या ‘डियर क्लास’ या व्हर्च्युअल सोहळ्या दरम्यान जगभरातील विद्यार्थ्यांना संबोधित केले.

पिचाई यांनी कठीण काळात सकारात्मक राहण्याबद्दल आपल्या आयुष्यातील अनुभवांचा दाखला देत असे सांगितले कि, मी अमेरिकेतील स्टॅंडफोर्ड विद्यापीठात शिकायला येण्यासाठी माझ्या विमान प्रवासावर वडिलांचा अख्या वर्षाचा पगार खर्च व्हायचा.

अमेरिका खूप महागडा देश होता त्यावेळेला घरी फोन करण्यासाठी दर एक मिनिटाला दोन डॉलर एवढा खर्च यायचा.

पिचाई पुढे म्हणाले, अमेरिकेत शिकायला आल्यानंतरच मला सारखा संगणक हाताळायला मिळाला. तसेच वयाच्या दहा वर्षांपर्यंत साधा टेलीफ़ोन पाहायला मिळाला नव्हता.

ज्यावेळेला आम्ही टीव्ही घेतला त्यावर देखील फक्त एकच चॅनेल दिसायचे. मात्र, आता परिस्थिती तशी राहिली नाही अगदी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वाना तंत्रज्ञानाचा सहज वापर सुलभ झाला आहे.

चेन्नईमध्ये वाढलेल्या सुंदर पिचाई यांनी मटेरियल इंजिनियर म्हणून कारकीर्दीची सुरूवात केली होती. त्यानंतर 2004 मध्ये गूगलमध्ये मॅनेजमेंट एक्झिक्युटिव्ह म्हणून रुजू झाले, 2015 मध्ये ते कंपनीचे प्रॉडक्ट चीफ आणि मुख्य कार्यकारी अधिकारी बनले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.