BNR-HDR-TOP-Mobile

Lonavala : तुमचा मुलगा भाऊ म्हणून पार्थच्या पाठीशी उभे रहा : सुनेत्रा पवार

PST-BNR-FTR-ALL

एमपीसी न्यूज – तुमचा मुलगा भाऊ म्हणून पार्थच्या पाठीशी उभे रहा असे भावनिक आवाहन मावळचे राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार पार्थ पवार यांच्या मातोश्री सुनेत्रा पवार यांनी महिला व कामगारांना केले.

सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीमध्ये आज लोणावळ्यात शिवक्रांती कामगार संघटनेच्या कामगार प्रतिनिधीचा मेळावा तसेच महिलांचा मेळावा पार पडला.

यावेळी बोलताना सुनेत्री पवार म्हणाले मावळवासीयांची सेवा करण्याची संधी पार्थला मिळाली आहे. पार्थवर जो विश्वास या मतदार संघातील नागरिकांनी टाकला आहे. तो निश्चित सार्थ ठरविण्याचे काम पार्थ करेल.

मागील पाच वर्षात देश कोठे नेऊन ठेवलाय तेच समजत नाही. शेतकरी, कामगार, महिला, उद्योजक यापैकी कोणत्याही घटकाला समाधानकारक न्याय दिला गेला नाही. तुमचे प्रश्न सोडविण्याकरिता पार्थच्या पाठीशी तुमचा मुलगा, भाऊ म्हणून उभे रहा असे आवाहन त्यांनी केले. यावेळी पुढे बोलताना पवार म्हणाल्या पार्थ निवडून तर येणारच आहे पण सर्वात जास्त मताधिक्क्याने निवडून द्या असे मी पार्थची आई म्हणून सांगते. सर्व देशाचे लक्ष ह्या मतदार संघाकडे लागले आहे. सर्वांनी पार्थवरील विश्वास सार्थ करुन दाखवा मात्र फाजिल आत्मविश्वास बाळगू नका, सतर्क रहा, नेटाने प्रचार करा अशा सुचना देखिल दिल्या.

यावेळी शिवक्रांती कामगार संघटनेच्या संघटक व जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा अर्चना घारे, सरचिटणीस अॅड. विजयराव पाळेकर, सेवादलाचे प्रदेशाध्यक्ष दीपक मानकर, शहर‍ाध्यक्ष जीवन गायकवाड, महिलाध्यक्षा मंजुश्री वाघ, माजी नगराध्यक्ष अमित गवळी, मनसेचे शहराध्यक्ष भारत चिकणे, महिलाध्यक्षा संगित‍ा गुजर, विक्रम कदम, बाळासाहेब पायगुडे, अनिता धायगुडे, राजु बोराटी, राजेश मेहता, नारायण पाळेकर आदी उपस्थित होते.

मावळ मतदार संघात शिवक्रांतीचे सुमारे 15 ते 20 हजार कामगार आहेत. ते तन मन धनाने पार्थ पवार यांच्या पाठीशी उभे राहतील असे आश्वासन शिवक्रांतीचे सरचिटणीस विजयराव पाळेकर यांनी दिले. पार्थच्या प्रचारात सर्व पवार कुठुंब सक्रिय झाल्याने मावळातील वातावरण ढवळून निघाले आहे.

.

HB_POST_END_FTR-A1
.